शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी नवरीने सासऱ्याच्या मांडीवर बसण्याची अनोखी प्रथा, ७ ते ११ वेळा करावी लागते उठक-बैठक...पाहा कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:56 IST

Nigerian Marriage Tradition : या प्रथेदरम्यान नवरीला आपले सासरे किंवा कधी कधी नवरेदवाच्या मांडीवर बसण्यासाठी सांगितलं जातं. ही प्रक्रिया एक-दोन वेळा नाही तर एक निश्चित संख्येत करायला लावली जाते.

Nigerian Marriage Tradition : जगभरात लग्नासंबंधी वेगवेगळे रितीरिवाज पार पाडले जातात. काही प्रथा तर इतक्या अनोख्या असतात की, सहज त्यांवर विश्वास बसत नाही. दोन तर अशा जमातींमधील एका वेगळ्याच प्रथेबाबत आपण आज पाहणार आहोत. या जमातींमध्ये नव्या जोडप्याचं लग्न संपन्न झालं हे ठरवण्यासाठी नवरीला सासऱ्याच्या किंवा नवरदेवाच्या मांडीवर ७ ते ११ वेळा बसावं लागतं. चला तर जाणून घेऊ नेमकी काय असते ही प्रथा आणि असं का केलं जातं.

नायजेरियाच्या दक्षिणी भागात राहणाऱ्या दोन जमाती एदो (Edo) आणि एसान (Esan) जमातींमध्ये ही परंपरा फार पूर्वीपासून पार पाडली जाते. इथे लग्न समारंभ तोपर्यंत पूर्ण मानला जात नाही जोपर्यंत नवरी ही अनोखी प्रथा पूर्ण करत नाही. या प्रथेदरम्यान नवरीला आपले सासरे किंवा कधी कधी नवरेदवाच्या मांडीवर बसण्यासाठी सांगितलं जातं. ही प्रक्रिया एक-दोन वेळा नाही तर एक निश्चित संख्येत करायला लावली जाते. सामान्यपणे ७ ते ११ वेळा ही प्रक्रिया केली जाते.

या प्रथेमागे लोकांची मान्यता अशी आहे की, ही प्रथा नवरीने आपलं घर सोडून सासरच्या परिवारात पूर्णपणे सामिल होण्याचं प्रतीक आहे. सासऱ्याच्या मांडीवर बसणं हे दर्शवतं की, आता ती त्या घरातील मुलगी झाली आहे आणि परिवारातील मोठ्यांनी तिचा मनापासून स्वीकार केला आहे. या प्रथेला एकप्रकारे बदलाची प्रथा मानली जाते. नायजेरियाच्या संस्कृतीमध्ये संख्येला फार महत्व असतं. नवरीने सासऱ्याच्या मांडीवर ७ ते ११ वेळा बसणं याचं प्रमाण असतं की, ती या लग्नासाठी मानसिक आणि शारीरिक रूपाने तयार आहे. 

प्रत्येकवेळी मांडीवर बसताना काही खास प्रार्थना किंवा मंत्र उच्चारले जातात. स्थानिक लोकांचं मत आहे की, इतक्या वेळा ही प्रक्रिया रिपीट केल्याने लग्नाचं नातं अतूट राहतं आणि येणाऱ्या काळात पती-पत्नीमध्ये कोणतीही अडचण येत नाही. ही प्रथा साक्षीदार आणि लोकांसमोर सार्वजनिकपणे केली जाते. ही मांडीवर बसण्याची प्रथा पार पाडल्यानंतर नवरदेव नवरीला घट्ट मीठी मारतो. नवरदेवाची ही मीठी याचा संकेत असते की, त्याने त्याच्या पत्नीची जबाबदारी पूर्णपणे घेतली आहे. तसेच या क्षणापासून नवरीवर तिच्या पतीचा आणि सासरच्या लोकांचा अधिकार आणि तिच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

यानंतर लग्न संपन्न झाल्याची घोषणा केली जाते. आजच्या आधुनिक जगातही एदो आणि एसान समुदायातील लोक आपली ही परंपरा जपून आहेत. बाहेरच्या जगासाठी ही प्रथा जरा अजब आहे. पण नायजेरियातील समाजात ही प्रथा सन्मानजनक आणि पवित्र मानली जाते. हा प्रथेद्वारे हे निश्चित होतं की, नवरीचं आपल्या सासऱ्यांसोबतचं नातं वडील आणि मुलीसारखं मजबूत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Unique Nigerian wedding tradition: Bride sits on father-in-law's lap.

Web Summary : In Nigeria's Edo and Esan tribes, brides must sit on their father-in-law's lap 7-11 times to signify acceptance into the family. This tradition symbolizes the bride's integration and ensures a strong bond with her new family, solidifying the marriage.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स