शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या साखरपुड्याला निघालेला तरुण अपघातात ठार; महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 19:30 IST

Accident Case : नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान याच्या चुलत मामाचा रविवारी बामणोद, ता.यावल येथे साखरपुडा होता. त्यासाठी सकाळीच तो दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.एम.६६५३) बामणोदकडे निघाला.

ठळक मुद्देवैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यास मृत घोषीत केले. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने डॉ.अहिरे यांनी पाळधी पोलिसांना घटनेची माहिती कळविली.

जळगाव : बामणोद,ता.यावल येथे चुलत मामाच्या साखरपुड्याला जायला निघालेला सोपान सुभाष शिरसाठ (वय २५,रा.देवगाव, ता.जळगाव, मुळ रा.कुसुंबा,ता.चोपडा) हा तरुण अर्ध्या रस्त्यातून परत झाला आणि घरी जाताना राष्ट्रीय महामार्गावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानजीक सख्या मामाच्या ढाब्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजता घडली.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान याच्या चुलत मामाचा रविवारी बामणोद, ता.यावल येथे साखरपुडा होता. त्यासाठी सकाळीच तो दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.एम.६६५३) बामणोदकडे निघाला. विदगावपर्यंत गेला व तेथून तो माघारी फिरला. मागे का फिरला याचे कारण कोणालाच माहिती नाही. पाळधीमार्गे घरी जात असताना राष्ट्रीय महामार्गावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तो जागीच गतप्राण झाला. घटनास्थळावर तरुणाचा मृतदेह पाहून काही लोकांनी पाळधीत माहिती दिली. एका रुग्णवाहिकेतून त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यास मृत घोषीत केले. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने डॉ.अहिरे यांनी पाळधी पोलिसांना घटनेची माहिती कळविली. दरम्यान, गेल्या आठ दिवसापासून महामार्ग तसेच राज्यमार्गावर अपघातांची मालिकाच सुरु झालेली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातJalgaonजळगाव