शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांची शिकार करणा-या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:38 IST

जंगलांमध्ये वन्यप्राण्यांची शिकार करणा-या टोळीचा जामनेर पोलिसांनी सोमवारी पहाटे पर्दाफाश केला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पाठलाग करताना दोन जण पळून जाण्यास यशस्वी झाले. दरम्यान, अटक केलेल्या दोघांकडून दोन बंदुका, ४८ मोठे जिवंत राऊंड, एक चारचाकी वाहन,काळविट व निलगायीचे मांस जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये महेमुद मोहम्मद अबीद (४५) व अन्सारी सोद मोहमद अबीद (३२ ) दोन्ही रा.धुळे यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजामनेर पोलिसांची कामगिरी दोघांना अटकमांस, बंदूक व काडतूस जप्त

जळगाव : जंगलांमध्ये वन्यप्राण्यांची शिकार करणाºया टोळीचा जामनेर पोलिसांनी सोमवारी पहाटे पर्दाफाश केला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पाठलाग करताना दोन जण पळून जाण्यास यशस्वी झाले. दरम्यान, अटक केलेल्या दोघांकडून दोन बंदुका, ४८ मोठे जिवंत राऊंड, एक चारचाकी वाहन,काळविट व निलगायीचे मांस जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये महेमुद मोहम्मद अबीद (४५) व अन्सारी सोद मोहमद अबीद (३२ ) दोन्ही रा.धुळे यांचा समावेश आहे.जामनेर तालुक्यातील नागनचौक जंगलात सोमवारी पहाटे पाच वाजता काही जण वाहने व बंदूका घेऊन नीलगाय व काळवीटची अवैधरित्या शिकार करीत करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना मिळाली. इंगळे यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, उपअधीक्षक ईश्वर कातकाडे यांना कळवून सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, उपनिरीक्षक विकास पाटील, सहायक फौजदार जयसिंग राठोड, ईस्माईल शेख, राहुल पाटील, सचिन पाटील,अमोल घुगे, प्रदीप पोळ यांना सोबत घेऊन तात्काळ नागनचौकी जंगल गाठले.वाडीकिल्ला येथील पोलीस मित्र विलास पाटील व गावकºयांची मदत घेवून संशयितांना घेराव घातला.पाठलाग करताना वाहन उलटलेनागनचौकी जंगलात संशयितांना घेरल्यानंतर दोन जण वाहन सोडून जंगलात पळून जाण्यात यशस्वर झाले तर अन्य दोघं जणांनी चारकाचीतून (एम.एच.०२ जे ९७६०) पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला असता ही चारचाकी रस्त्यात उलटली, त्यात अन्सारी सोद मोहमद अबीद याच्या डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला. त्याचा दुसरा साथीदार महेमुद मोहम्मद अबीद याला पक डण्यात आले. पलायन केलेल्यांची नावे हर्षद ड्रायव्हर रा.अकबर चौक, धुळे  व उस्मान शहा रा.नाचणखेडा ता.जामनेर असे आहेत. या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, कर्मचारी तुळशिराम नागोराव घरजाळे, अशोक ज्योतीराम सपकाळे हे देखील सहभागी झाले होते.याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहायक धरमसिंग सुंदरडे करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव