लोकसहभागातुन विविध कामे सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:41 IST2019-06-15T18:40:44+5:302019-06-15T18:41:33+5:30
कुºहाड येथील तरुणांचा पुढाकार

लोकसहभागातुन विविध कामे सुरु
कुºहाड : पाचोरा तालुक्यातील कुºहाड खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावात पाणी फाउंडेशन व लोकसहभागातून पाणी अडविणे आणि जिरवण्यासाठी विविध कामांना नुकतची सुरवात झाली. उतावळी नदीचे खोलीकरण, शोषखड्डे व नदीलगतच्या विहिरींचे पुनर्भरण, सांडपाणी खोल खड्डा करुन जिरवण्यात येत आहे.
जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी जलसंपदा औरंगाबाद विभाग क्रमांक २ यांच्या माध्यमातुन या कामांसाठी पोकलँड मशीन उपलब्ध करुन दिले. लोकसहभागातुन या कामाची सुरुवात झाल्याने गावकºययांनी आनंद व्यक्त केला. काही वर्षांपासुन सलग दुष्काळाला सामोरे जावे लागत असुन गुराढोरांसह पिण्याच्या व वापराच्या पाण्याची समस्या दरवळेसच असते, त्याअनुशंगाने गावातील तरुण एकत्र येउन लोकसहभागातून हा उपक्रम राबवत आहे ,जेणेकरुन या माध्यमातुन दुष्काळावर मात करता येईल. कमी पर्जन्यमान आणि वाढत्या उष्णतेमुळे भूजलस्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आज दुष्काळाच्या परिस्थितीशी लढा देण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे व पाण्याची पातळी वाढविणे, अशा प्रकारची जबाबदारी या तरुणांनी स्वीकारली आहे.