शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा येथे म.गांधी शिक्षण मंडळातर्फे एकत्रित कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 16:02 IST

म. गांधी शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत संस्थेंतर्गत विविध विभागांनी एकत्र येत एकाच व्यासपीठावर कला महोत्सव या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम एकाच व्यासपीठावर सादर केले.

ठळक मुद्देसांस्कृतिक कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसह वठवल्या विविध भूमिकामान्यवरांनी केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुकया वर्षी प्रथमच एकाच व्यासपीठावर सर्व कार्यक्रम झाल्याचा प्रयोग यशस्वी

चोपडा, जि.जळगाव : म. गांधी शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत संस्थेंतर्गत विविध विभागांनी एकत्र येत एकाच व्यासपीठावर कला महोत्सव या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम एकाच व्यासपीठावर सादर केले. त्यात सादर झालेला सांस्कृतिक कार्यक्रम हे शहरातील आकर्षण ठरले.यात बालवाडीपासून तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील सुप्त कलागुणांना आणि कलाविष्कार याला संधी मिळाली. म.गांधी शिक्षण मंडळामार्फत चालवले जाणारे बालवाडी विभाग, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, कला, शास्त्र, वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज, डी.फार्मसी कॉलेज, आॅक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, नर्सिंग कॉलेज हे सर्व विभाग मिळून कार्यक्रम झाला.सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची भूमिका वठवून नाटिका सादर करणे, रिमिक्स गाण्यांवर डान्स करणे, नाट्यछटा, एकपात्री नाटक, मिमिक्री आवाज, गीत गायन यासारखे कार्यक्रम सादर केले.या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार अनिल गावित, नायब तहसीलदार जितेंद्र पंजे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे, चोपडा ग्रामीणचे प्रभारी संदीप आराक, संस्थेचे संचालक, संस्थाध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, सचिव डॉ.स्मिता पाटील, उपाध्यक्ष आशा पाटील, माजी प्राचार्य डॉ.पी. बी.पवार, संचालक प्रा.डी. बी.देशमुख, सुरेश सीताराम पाटील, सहसचिव तथा प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांनी केले.सूत्रसंचालन कलाशिक्षक दिनेश बाविस्कर, प्रा.पटवे, संदीप भास्कर पाटील, प्रा.डॉ.शैलेश वाघ आदींनी केले. या वर्षी प्रथमच एकाच व्यासपीठावर सर्व कार्यक्रम झाल्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने याच पद्धतीने कार्यक्रम राबविण्यात यावेत, असे विविध विभागातील प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी बोलून दाखवले.कला महोत्सव यशस्वीतेसाठी सर्व विभागातील प्रमुख त्यात उपप्राचार्य बी.एस. हडपे, पर्यवेक्षक व्ही.वाय. पाटील, मुख्याध्यापक नीळकंठ सोनवणे, मुख्याध्यापक भूपेश सोनवणे, प्राचार्या रेखा पाटील, अशोक साळुंखे, प्रा.आर.आर. पाटील, भूषण पवार, प्रा.पी.एल.लोहार आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SchoolशाळाAmalnerअमळनेर