शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन घटनांमध्ये तुफान हाणमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 01:35 IST

सकाळी सुभाष चौकात तर रात्री नेरी नाक्यावर तणाव

जळगाव : शहरात शनिवारी सुभाष चौकात तर रात्री नेरी नाका परिसरात दोन गटात वाद उफाळून आला. त्यामुळे दोन्ही गट समोरासमोर आल्याने तुफान हाणामारी झाली. त्यात दगडफेक व लोखंडी रॉडचा वापर झाला. दोन्ही घटनेत पाच जण जखमी झाले असून एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.हातगाडी लावण्याच्या कारणावरुन सुभाष चौकरात दोन हॉकर्समध्ये शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता जोरदार हाणामारी झाली. त्यात शेख इम्रान शेख एजाजुद्दीन (२२, रा.शाहू नगर) याने राजू सखाराम पाटील (४० , रा. कासमवाडी) याच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकल्याने तो जागीच कोसळला. या घटनेने सुभाष चौकात पळापळ होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली होती. एजाजुद्दीन शेख याला अटक करण्यात आली आहे.दरम्यान, जखमी राजू याला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे २४ टाके घालण्यात आले आहेत. या घटनेतील दुसरा शेख इम्रान यालाही दुखापत झाली असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन गटातील या वादामुळे परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.इम्रान शेख व राजू पाटील या दोघांमध्ये शनिवारी सकाळी हातगाडी लावण्यावरुन कडाक्याचे भांडण झाले. त्यात शेख इम्रान याने राजू पाटील याच्या डोक्यात लोखंडी पाईप टाकला. भांडण सोडविण्यासाठी आलेली राजूची आई सुशिलाबाई व मुलगा दुर्गेश यांनाही मारहाण झाली. त्यामुळे हॉकर्स व ग्राहकांमध्ये पळापळ झाली. तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन निरीक्षक विठ्ठल ससे, शहरचे अरुण निकम, दिलीप भागवत यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.जखमी दहा मिनिटे रक्ताच्या थारोळ्यातया घटनेत डोक्याला मार लागल्याने राजू पाटील जमिनीवर कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात असल्याने लोकांमध्येच भीती निर्माण झाली होती. तर आई मदतीसाठी याचना करीत होती. दहा मिनिटे राजू जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. नतर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव