शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मन्यारखेड्यात एकाच रात्री ४ घरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 13:16 IST

नशिराबाद : येथून जवळच असलेल्या मन्यारखेडा शिवारात एम.आय.डी.सी. परिसरातील साई नगरात एकाच रात्री ४ घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोबाईलसह एकूण ...

नशिराबाद : येथून जवळच असलेल्या मन्यारखेडा शिवारात एम.आय.डी.सी. परिसरातील साई नगरात एकाच रात्री ४ घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोबाईलसह एकूण ३० हजार ५०० रूपयांची रोकड लांबविली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली.याबाबत सुनिल चरणसिंग चव्हाण (२७) यांनी तक्रार दिल्यावरून नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.एम.आय.डी.सी. मधील चटई कंपनीत कामास असलेले सुनिल चव्हाण व त्यांचे बंधू रवि चव्हाण यांचे ७००० रू. किमतीचा मोबाईल तसेच साईनगर भागातील अशोक बाबा घुले यांच्या भाड्याच्या खोलीत राहणारे संजय बापूलाल साहनी यांचे १५ हजार रुपए रोख, संजयकुमार शिवचंद महतो यांचे ५ हजार तसेच सुभाष सोपान अकोलकर यांचे १ हजार ५०० रू. रोख व मीरादेवी धनूराम यादव यांचे २ हजार रू. रोख असे २३ हजार ५०० रूपयांची रोकड व मोबाईलचे ७ हजार असे एकूण ३० हजार ५०० रूपयांची चोरी झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान नशिराबाद सह परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ वाढल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. स.पो.नि. प्रवीण साळुंखे, प्रवीण ढाके सहकारी तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव