शिक्षक पुरस्काराची यादी अखेर जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 14:53 IST2019-09-15T14:53:38+5:302019-09-15T14:53:57+5:30

जळगाव : शिक्षक पुरस्कारांच्या बाबतीतला सस्पेंस अखेर रविवारी दुपारी दोन वाजता मिटला़ सोमवारी १६ रोजी होणाऱ्या या सोहळ्यात पंधरा ...

 Teacher award list is finally announced | शिक्षक पुरस्काराची यादी अखेर जाहीर

शिक्षक पुरस्काराची यादी अखेर जाहीर

जळगाव: शिक्षक पुरस्कारांच्या बाबतीतला सस्पेंस अखेर रविवारी दुपारी दोन वाजता मिटला़ सोमवारी १६ रोजी होणाऱ्या या सोहळ्यात पंधरा शिक्षकांना जिल्हा पुरस्कार तर चार शिक्षकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे़ अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्याकडून रविवारी दुपारी ही यादी जाहीर करण्यात आली आहे़

या शिक्षकांचा होणार गौरव
अशोक रघुनाथ पाटील (शिरूड ता़ अमळनेर), संगिता शिवाजी पाटील (गोंडगाव ता़ भडगाव), लिना सुरेश अहिरे (कन्हाळा ता़ भुसावळ), दिलीप शांताराम जवरे (पळासखेडे बु़ ता़ बोदवड), रमेश पांडूरंग जगताप (वैजापूर ता़ चोपडा), प्रदीप शांताराम पाटील (शिंदी ता़ चाळीसगाव), सुलोचना पांडूरंग बाविस्कर (केंद्र शाळा पाळधी ता़ धरणगाव), गोविंदा इच्छाराम वंजारी (दापोरी ता़ एरंडोल), किशोर मंगा सोनवणे (पिलखेड ता़ जळगाव), समाधान पांडूरंग ठाकरे (भिलखेड ता़ जामनेर), सुरेश रूपचंद सोनवणे (मेंढाळदे ता़ मुक्ताईनगर), आशा विलास राजपूत (कन्या नं़१ ता़ पाचोरा), मनिषा भानूदास शिंदे (बहादरपूर ता़ पारोळा), रेखा रत्नाकर वैद्य (मुंजलवाडी ता़ रावेर), कुंदन बळीराम वायकोळे (वनोली ता़ यावल)़

हे आहेत प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त शिक्षक
काझी मोहम्मद अनीस वसियुद्दीन (उर्दू कन्या शाळा, नशिराबाद), नरेंद्र विठ्ठल पाटील (बलवाडी ता़ रावेर), कैलास मधुकर माळी (धरणगाव), अजित निळकंठ चौधरी (टोके विद्यामंदिर, जळगाव),

 

Web Title:  Teacher award list is finally announced