शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
4
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
5
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
6
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
7
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
8
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
9
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
10
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
11
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
12
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
13
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
14
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
15
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
16
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदाणीवरुन रूममेट्स भिडले
17
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
18
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
19
Aparna Yadav: किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
20
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सालार नगर, मिल्लत नगर अंडरपासचा प्रस्ताव न दिल्यास ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सालार नगर, मिल्लत नगर, अक्सा नगर, मास्टर कॉलनी या परिसरासाठी अंडरपास नसल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सालार नगर, मिल्लत नगर, अक्सा नगर, मास्टर कॉलनी या परिसरासाठी अंडरपास नसल्याने मागील वर्षापासून वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या विरोधात विविध संघटना, राजकीय पक्षांच्या मंडळींनी शुक्रवार ४ डिसेंबर रोजी महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात धडक दिली. १० दिवसात प्रस्ताव न गेल्यास महामार्ग कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. वेळ देऊनही प्रकल्प संचालक भेटत नसल्याने या वेळी संताप व्यक्त केला.

शहरातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात सालार नगर, मिल्लत नगर, अक्सा नगर, मास्टर कॉलनी हा परिसर सुमारे तीस ते चाळीस हजार लोकवस्तीचा आहे. या महामार्गवर कोणत्याही प्रकारचा अंडरपास नसल्याने मागील वर्षापासून परिसरातील नगरसेवक व नागरिक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना भेटून तसेच खासदार, आमदार, महापौर व सामाजिक संघटनेचे विविध पदाधिकारी भेटून अंडर पासची मागणी करीत आहे. असे असताना अद्याप प्राधिकरणाने अधिकृतरित्या कोणतीही कारवाई केली नसल्याने शुक्रवार ४ डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख यांनी जळगाव शहरातील सर्व राजकीय पक्ष प्रमुख व शाळेचे प्रमुख, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मझर खान, काँग्रेसचे शहर प्रमुख नदीम काझी, मनसेचे अध्यक्ष जमील देशपांडे, शिवसेना महानगराध्यक्ष झाकीर पठाण, मार्क्सवादीचे अकिल पठाण, मिल्लत हायस्कुलचे मुख्याध्यापक मुश्ताक मिर्झा, शाह बिरादरी शाळेचे प्रमुख जाहिद शाह,अक्साबॉईज फाउंडेशनचे ॲड. आमिर शेख यांच्या सह जाऊन महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात धडक दिली.

अधिकाऱ्यांशी चर्चा

शिष्टमंडळाने उपस्थित अधिकारी वर्गास आपल्या मागण्या व महामार्गाचे म्हणणे लेखी स्वरूपात मागितले असता कार्यालयात उपस्थित उपव्यवस्थापक पंकज प्रसाद, अभियंता विश्वजित बागळकर व सी. एस. गायकवाड, सुभाष राऊत यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा हे जळगावी कार्यालयात आल्यावर योग्य तो लेखी अहवाल देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. सिन्हा हे १ ते ५ डिसेंबर पर्यंत नागपूर कार्यालयात कार्यालयीन कामासाठी गेले आहे, असे लेखी पत्र त्यांनी शिष्टमंडळास दिले.

प्रकल्प संचालक वेळ देऊनही भेटत नसल्याने कार्यालयातच मुक्कामाचा इशारा

प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांची अधिकृत भेटीची वेळ घेतली असतांना गुरुवारची भेट सुद्धा रद्द केली व त्यांनीच दिलेली शुक्रवारच्या भेटीची वेळ देऊन सुद्धा ते जळगावी पोहोचू शकले नाही. त्यामुळे शिष्टमंडळाने कार्यालयातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. परंतु चंद्रकांत सिन्हा यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिलगिरी व्यक्त करून कार्यालयीन कामानिमित्त नागपूर येथेच असल्याचे स्पष्ट केल्याने शिष्टमंडळाने ते मान्य केले.

फोटो कॅपशन

महामार्ग प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना फारूक शेख,जमील देशपांडे, नदीम काझी, मझर खान, झाकीर पठाण,मुश्ताक मिर्झा,जाहिद शाह,ॲड. आमिर शेख व नबील शेख.