शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या लॉकडाऊन व सीएमव्हीमुळे घटत्या संतुलित केळी उत्पादनाच्या भावात चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST

रावेर : गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दोन-तीन महिने केळीच्या उतीसंवर्धित रोपनिर्मिती करणार्‍या वातानुकूलित प्रयोगशाळा बंद राहिल्याने व रोपे उपलब्धतेनुसार पर्यायाने ...

रावेर : गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दोन-तीन महिने केळीच्या उतीसंवर्धित रोपनिर्मिती करणार्‍या वातानुकूलित प्रयोगशाळा बंद राहिल्याने व रोपे उपलब्धतेनुसार पर्यायाने टप्प्या-टप्प्याने केळी लागवड उशिरा झाली. त्यातच उशिरा लागवड झालेल्या केळीबागा कुक्कूंबर मोझॅक व्हायरसने उखडून फेकाव्या लागल्याने केळी लागवडीचे चक्र उशिरापर्यंत टप्प्या-टप्प्यात सुरू राहिले होते. त्याची फलश्रुती म्हणून यंदा मार्च महिन्यापासून ते आजपावेतो व पुढेही उशिराने संतुलित पध्दतीने कापणीवर येणाऱ्या केळीबागांमधील मालाच्या भावाची चांदी प्रतिक्विंटल हजार ते पंधराशे रुपये राहणार असल्याची स्थिती केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुखेनैव ठरली आहे.

दरवर्षी केळी लागवड मे, जून, जुलै महिन्यात एकाचवेळी होऊन केळी उत्पादनाची कापणीही एकाचवेळी सुरू होत असल्याने केळी मालाची उपलब्धता एकाचवेळी होत असते. परिणामी, केळी मालाची आवक वाढून मागणीत घसरण, म्हणजे केळीचे बाजारभाव गडगडत असल्याची विदारक स्थिती दरवर्षी पाहायला व अनुभवायला मिळते.

गतवर्षी मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उतीसंवर्धित केळी रोपांची निर्मिती करणाऱ्या वातानुकूलित प्रयोगशाळा बंद राहिल्याने टिश्युकल्चर केळी रोपांची उपलब्धता कमालीच्या विलंबाने व टप्प्या-टप्प्याने होत राहिल्याने केळी लागवड गतवर्षी उशिरापर्यंत सुरू राहिली. किंबहुना, नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने... याप्रमाणे कुक्कूंबर मोझॅक व्हायरसने डोके वर काढल्याने हजारो हेक्टरमधील लागवडीखालील केळीबागा जळामुळांसकट उपटून फेकण्याचे संकट ओढवले. त्या रोगग्रस्त बागांवर पुनर्लागवड उशिरापर्यंत सुरूच राहिल्याने गतवर्षी केळी लागवडीचे चक्र अनायासास मार्चपासून ते थेट सप्टेंबर व ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरूच होते.

परिणामी रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा तालुक्यात एकाचवेळी होणाऱ्या केळी लागवडीचा फटका एकाचवेळी कापणीवर येणाऱ्या केळीमालाच्या उत्पादनाला न बसता, लॉकडाऊन व कुक्कूंबर मोझॅक व्हायरसच्या तांत्रिक कारणांमुळे मार्च महिन्यापासून ते आजपावेतो केळी भाव स्थिर असून थेट ऑक्टोबर वा नोव्हेंबर महिन्यापर्यंत निघणाऱ्या नवती केळीच्या मालाला किमान १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल किंबहुना त्यापेक्षा जास्त भावाने केळीच्या बाजारभावात चांदी राहण्याची शक्यता जाणकार शेतकर्‍यांमधून वर्तवली जात आहे.

यंदा एक लाख मेट्रिक टन केळी निर्यातीची उद्दिष्टपूर्ती होणार

फेब्रुवारीपासून ते मे महिन्यापर्यंत रावेर व यावल तालुक्यातून पूर्वमध्य आखाती राष्ट्रांत सुमारे तीन हजार कंटेनरमधून ६० हजार मेट्रिक टन केळीची निर्यात झाली आहे. किंबहुना, गतवर्षी लॉकडाऊन व सीएमव्हीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या चक्राकार केळी लागवडीतून केळी उत्पादनाची आवकही चक्राकार पध्दतीने लांबणार असल्याने थंडीच्या चिलिंग एन्ज्युरीनंतर नोव्हेंबरनंतर सुरू होणार्‍या केळी निर्यातीच्या व्यवसायाला यंदा जुलैअखेर वा ऑगस्टपासूनच केळी निर्यातीची संधी उपलब्ध होणार असल्याचा आत्मविश्वास केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. किंबहुना, यंदा १ लाख मेट्रिक टन केळी आखाती राष्ट्रांत निर्यात करण्याची उद्दिष्टपूर्ती होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.