शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी दवाखाने बंद ठेवणाऱ्यांचे परवाने रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 12:00 IST

आरोग्य मंत्र्यांचे आदेश : २४ तासात अहवाल यायलाच हवेत

जळगाव : खासगी डॉक्टरांनी पीपीई किट परिधान करून रुग्णसेवा दिलीच पाहिजे, अशा काळात ज्या डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवली आहेत़ त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेतच जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांना दिले़ खासगी डॉक्टरांनी रुग्णांना कोविडचे प्रमाणपत्र मागण्याची गरजच नाही, अशी माहिती त्यांनी दिली़ जास्तीत जास्त ४८ तासात तपासणी अहवाल यायला हवे, असे त्यांनी बजावले.तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेला टास्क फोर्स तयार करण्यात येणार असून यासह मुंबईच्या टास्कफोर्सचाही सल्ला घ्या, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली़ काहीही करा, नाशिकला पाठवा, मुंबईला पाठवा, खासगी लॅबकडे पाठवा मात्र, २४ तासात अधिकाधिक ४८ तासात तपासणी अहवाल यायलाच हवे, अशा सक्त सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत़ आयएमएच्या डॉक्टरांनी आठ तास पूर्ण वेळ सेवा देणे अपेक्षित आहे़ केवळ तीन तास सेवेवर होणार नाही, जिल्हाधिकारी नावानीशी आॅर्डर काढतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली़जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकारस्थानिक पातळीवर तातडीने डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांची भरती करून तातडीने मुलाखती घेऊन त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाºयांना आहेत़ जे डॉक्टर येत नाहीत त्यांच्यावर मेस्मातंर्गत कारवाईचा निर्णय राज्यपातळीवर झाला आहे़ त्याचे अधिकारही जिल्हाधिकाºयांना आहेत़ त्यांनी त्याचा वापर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले़ कोविड रुग्णालयात सर्व प्राध्यापकांनी सेवा द्यावी, याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले़ कोविड रुग्णालयात सीसीटीव्ह बसवा, दररोज डॉक्टर सेवा देत आहेत की नाही ते तपासा, असेही निर्देश त्यांनी दिले़

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव