शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाजनादेश यात्रेची फलश्रृती : अनेकांना उमेदवारीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 01:33 IST

चुडामण बोरसे  जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांना ...

चुडामण बोरसे जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांना उमेदवारी मिळण्याचे संकेत तर मिळालेच शिवाय काही जणांना संभ्रमातही टाकले आहे.मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दोन दिवस जिल्ह्यात होती. यात अमळनेर, पारोळा, जळगाव, भुसावळ, जामनेर आणि बोदवड येथील सभा आणि स्वागतप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला महाजनादेश आहे काय असा प्रश्न करीत जनतेकडूनच उत्तर घेतले. मध्यंतरीच्या काळात तर भाजपच्या आमदारांचे तिकिट कायम ठेवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. आता आणखी आशिर्वाद आणि महाजनादेश आहे का? अशी विचारणा करीत एकाच दगडात अनेक पक्षीही मारण्याचा प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे.अमळनेरला आमदार शिरीष चौधरी आणि आमदार स्मिता वाघ या दोघांना आशिर्वाद आहे का? अशी विचारणा केली. या गुपितामधून आपल्यालाच तिकिट मिळेल, अशी आशा दोन्ही आमदारांच्या समर्थकांना नक्कीच असतील. तर दुसरीकडे आमदार चौधरी यांनी वेगळा मार्ग स्वीकारला तर स्मिता वाघ आहेतच, अशीही एक चर्चा रंगू लागली आहे.पारोळ्यात राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या विरोधात आता पुतणे करण पवार हे भाजपतर्फे लढणार हे निश्चित झाले आहे. जळगावातही आमदार सुरेश भोळे आणि मला आशिर्वाद द्या असे सांगत फडणवीस यांनी भोळे यांचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे. अशी विचारणा त्यांनी भुसावळच्या सभेत आमदार संजय सावकारे यांच्यासाठी आणि शनिवारी सकाळी बोदवड येथील स्वागतप्रसंगी खडसे, गिरीश महाजन आणि आपणास आशिर्वाद द्या... अशी हाक देत त्यांनी उपस्थितांनी मने जिंकली. आता ज्यांच्यासाठी विचारणा केली त्यांची तिकिटे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहेत. या महाजनादेश यात्रेत अनेक जण भाजपमध्ये येतील अशी अपेक्षा होती. यात माजी मंत्री गुलाबराव देवकर व पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्याही नावाची चर्चा होती. आता या सर्वांना घ्यायचे म्हटले तर जागा कुठे द्यायची असाही प्रश्न कायम आहे. त्यामुळे युतीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत थांबा असा सल्ला देण्यात आल्याची चर्चा आहे.जिल्हा बँक सध्या खडसे गटाच्या ताब्यात आहे. तिथे एक विश्वासू सहकारी आणून बँकेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न गिरीश महाजन गटाकडून सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यासाठी देवकर यांना भाजपात आणण्याची तयारी सुरु झाली असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव