शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल लवकर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:16 IST

महापौरांची मागणी: पाच-पाच दिवस प्रलंबित राहताहेत अहवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत ...

महापौरांची मागणी: पाच-पाच दिवस प्रलंबित राहताहेत अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संसर्ग अधिक पसरत आहे. कोरोना संशयितांची मनपाकडून आरटीपीसीआर चाचणी केली जात असून त्याचे तपासणी स्वॅब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणा कमी पडत असून, रुग्णांना तब्बल पाच-पाच दिवस अहवालांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे अनेक रुग्ण स्वॅब देवून बाहेर देखील फिरतात त्यामुळे अहवाल लवकरात लवकर मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी महापौर भारती सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.

याबाबत महापौरांनी पालकमंत्र्यांना निवेदन देखी दिले आहे. शहरात गेल्या १५ दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. मनपाकडून रुग्णांची कोरोना चाचणी करण्याची व्यवस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आलेली आहे. याठिकाणी दररोज सरासरी २०० संशयितांचे आरटीपीसीआर स्वॅब जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येतात. मात्र, दररोज सरासरी केवळ ६० लोकांचे अहवाल मनपाला प्राप्त होत आहेत. अनेक रुग्णांचे अहवाल ५-५ दिवस उशिरा येत असल्याने संशयित रुग्ण परिवारात आणि बाहेर इतरांमध्ये मिसळत असल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक वाढतो. कोरोना आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल लवकरात लवकर मिळावे यासाठी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना देत यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी मागणी महापौरांनी केली आहे.