Rape of a married woman in Pachora taluka near Wardha by Mavasdira | पाचोरा तालुक्यातील विवाहितेवर वर्ध्याजवळ मावसदिराकडून बलात्कार

पाचोरा तालुक्यातील विवाहितेवर वर्ध्याजवळ मावसदिराकडून बलात्कार

ठळक मुद्देपतीने विश्वासात घेऊन पत्नीला विचारल्यावर उघडकीस आली घटनादारूच्या नशेत मावसभावानेच केला उलगडा.

लाेकमत न्यूज नेटवर्क

पाचोरा : तालुक्यातील एका खेड्यात रहाणाऱ्या २१ वर्षीय विवाहितेवर कोल्हापूरराव ता. देव्हारी, जि. वर्धा येथे माहेरी गेली असताना सख्ख्या मावसदिराने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत महिलेने पतीसोबत येऊन पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला .

याप्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका खेड्यातील २१ वर्षीय विवाहिता माहेरी कोल्हापूरराव येथे बऱ्याच महिन्यापासून गेली नव्हती. पतीचा दुधाचा व्यवसाय असल्याने कुणीही घरचे सोबत येण्यास तयार नव्हते. अशावेळी नाशिक येथील एका हॉटेल परिसरात रहाणारा मावस दीर अनिकेत (सोनू) यास सोबत घेऊन जा, असे घरच्यांनी सांगितले. घरच्यांनीच विश्वासाने सेवाग्राम एक्सप्रेसचे आरक्षण करून दिले. त्यानुसार मावसदिरासोबत ही विवाहिता माहेरी फेब्रुवारी महिन्यात गेली.

दि २२ रोजी विवाहितेचे आईवडील बाहेर कामानिमित्त गेले असता विवाहिता घरी एकटीच असल्याचे पाहून सोबत गेलेल्या मावस दिराने बलात्कार केला व याची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही महिला सासरी परत आल्यावर विवाहितेचा पती व मावसदिर हे पाचोरा येथे रात्री पार्टीला आले असता दारूच्या नशेत झाला प्रकार त्या मावसदिराने पतीला कथन केला.

पत्नीला विश्वासात घेऊन पतीने थेट पाचोरा पोलिस स्टेशन गाठले. झाला प्रकार कथन करीत पाचोरा पोलिसात पीडितेने मावस दिराविरुध्द फिर्याद दिली. घटना वर्धा जिल्ह्यात घडल्याने पाचोरा पोलिसांनी तात्काळ गुन्हा देव्हारी पोलिस स्टेशनला वर्ग केला असून पुढील तपास देव्हारी पोलीस करीत आहे.

Web Title: Rape of a married woman in Pachora taluka near Wardha by Mavasdira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.