शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अन् पाड्यावरील आदिवासी बांधव आले धावून, विमान अपघातातील जखमी तरुणीला झोळीतून रुग्णालयात पोहोचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 20:38 IST

जखमी अंशिका हिला  झोळी करुन वर्डीपर्यत आणण्यात आले. तिथून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

संजय सोनवणे/ संजय पाटील चोपडा जि. जळगाव : वर्डी परिसरातील मिनी विमान कोसळल्याने  अचानक मोठा आवाज झाला आणि या आवाजाने डोंगररांगाही  हादरल्या. काही  अंतरावर असलेल्या झोपडीमधील लोक तिकडे धावले.  त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करीत जखमी अंशिका हिला  बाहरे काढले. जखमी अंशिका हिला  झोळी करुन वर्डीपर्यत आणण्यात आले. तिथून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

शिरपूर  येथील वैमानिकाचे प्रशिक्षण देणाऱ्या एव्हिएशन स्कूल चे छोटे विमान  बिघाड झाल्याने वर्डी तालुका चोपडा परिसरात  सातपुडा पर्वतातील दरी मध्ये झाडावर   कोसळले. त्यात पायलट नुरुल अमीन (३२) ठार झाला तर प्रशिक्षणार्थी अंशिका लखन गुजर (२८) ही गंभीर जखमी झाली. शिरपूर जिल्हा धुळे येथील स्कूल ऑफ एव्हीएशन या वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या स्कूलचे  छोटे विमान शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास  वर्डी येथून १० किलोमीटर अंतरावर सातपुडा पहाड भागात  कोसळले. ज्या भागात विमान कोसळले तो भाग अतिशय दुर्गम, निर्जन असा आहे. इथून  शेजारी काही अंतरावर पाडा होता आहे. या पाड्यावर रहिवासी आदिवासी तरुणांना मोठा आवाज झाला. आदिवासी तरुणांनी घटनास्थळी धाव घेत  मृत  पायलट नुरुल अमिन व जखमी अंशिका  गुजर यांना बाहेर काढले. विमान पडल्याचा आवाज आल्याने वर्डी  येथून अनेक तरुण घटनास्थळी धावले आणि जखमी अंशिका हिला झोळीत टाकून आणले. 

घटनेची माहिती मिळताच  चोपडा  उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील, डॉ नदीम शेख हे चालक  तोसिफ खान पठाण यांना १०८ रुग्णवाहिकेसह  वर्डीपासून अडीच किमी अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वतापर्यंत पोहोचले.  त्यानंतर अंशिका हिला रुग्णवाहिकेतून  उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

टॅग्स :JalgaonजळगावMaharashtraमहाराष्ट्र