शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅपरेशन अजगर’ फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:56 IST

पाच तासांचे प्रयत्न फळाला : विहीरीत पडलेल्या अजगराला वन्यजीव संरक्षण संस्थेचे जीवदान

जळगाव : शहरातील बीबा नगर भागातील विहीरीत पडलेल्या ८ फुट अजगराला वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी ५ तास जिकरीची मेहनत करून जीवदान दिले. जीवदान दिलेला अजगर काही प्रमाणात जखमी असल्याने शहरातील महाबळ भागातील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.बीबा नगर भागात रस्त्याच्या सपाटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना सकाळी ९.१५ वाजता बीबा नगरातील विजय साळूंखे यांना विहीरीच्या एका कपारीत अजगर आढळून आला. त्यानंतर त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या रविंद्र सोनवणे यांना याबाबतची माहिती दिली. अर्ध्यातासातच वन्यजीव संस्थेचे सदस्य व सर्पमित्र आपल्या रेस्क्यू कीटसह घटनास्थळी दाखल झाले व अजगराला जीवदान देण्याच्या मोहिमेला सुरुवात केली.बचावाचे तीन प्रयत्न झाले अयशस्वी१०.३० वाजेच्या सुमारास दोन सहकाऱ्यांनी विहीरीत दोरीच्या सहाय्याने उतरून अजगराला विहीरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजगराची लांबी व वजन देखील जास्त असल्याने अजगराला विहीरीतून काढणे कठीण होत होते. दोन वेळा विहीरीत उतरून देखील अजगराला बाहेर काढण्यास यश आले नाही. त्यानंतर खाटेला दोरीच्या सहाय्याने बांधून त्यावर दोन सहकारी बसून विहीरीत उतरले. मात्र, विहीरीत पाणी असल्याने अजगराला काढणे कठीण होत असल्याने मोहिम लांबत गेली.कपारीतून अजगराला काढणे होते कठीणदोन सहकारी विहीरीत उतरून देखील अजगराला काढणे अशक्य होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शीडी आणण्यात आली, शीडीव्दारे अजून दोन सहकारी विहीरीत उतरले.अजगर विहीरीतील एका कपारीत बसून राहिल्याने अजगराला काढण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. तसेच विहीरीत अजून काही सर्प असल्यानेही मोहीमेला लांबत गेली.सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरु झालेली मोहीम दुपारी ३.३० वाजेपर्यंत चालली. मोठी जिकरीने दुपारी ३.३० वाजता सर्पमित्रांनी अजगराला वाचविण्यात यश आले. अजगराला काही प्रमाणात जखमा झाल्यामुळे तत्काळ अजगराला पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्र वासुदेव वाढे यांनी दिली.अपघाताने अजगर विहरीत पडलाबिबा नगरचा हा भाग अजगर किंवा सर्पांसाठी नैसर्गिक अधिवास आहे. हा अजगर अपघाताने विहीरीत पडला असल्याची शंका सर्पमित्रांकडून व्यक्त करण्यात आली. ८ फुट असलेला हा अजगर इंडियन रॉक पायथन ( भारतीय पहाडी अजगर) या प्रकारातील बिनविषारी सर्प आहे. या मोहीमेत वासुदेव वाढे, रविंद्र सोनवणे, योगेश गालफाडे, निलेश ढाके, शितल शिरसाठ, बाळकृष्ण देवरे, महापालिका अग्निशमन दलाचे शशिकांत बारी , अश्वजित घरडे , प्रकाश चव्हाण , देविदास सुरवाडे , वसंत पाटील, विलास कुमावत, विजय चौधरी, किशोर महाजन यांनी विशेष प्रयत्न केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव