शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

मुर्दापूर धरण ओसंडून वाहू लागले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:35 IST

उंची वाढीचा मुहूर्त कधी?: ..तर जास्त पाणीसाठा झाला असता, दिरंगाईबाबत नाराजी

नशिराबाद : येथून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या मुदार्पूर धरण उंची वाढीचे पाच टक्के काम नऊ वर्षापासून रखडलेले आहे. सातत्याने सूचना देऊन तसेच पाठपुरावा करूनही तापी महामंडळातर्फे उंचीवाढीच्या कामात दिरंगाई होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.यंदाही मुर्दापूर धरण शंभर टक्के भरले असून ओसंडून वाहत आहे. लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. परिणामी उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते. मात्र धरणाची उंची वाढ झाली असती तर आज पाणी साठवण मोठ्या प्रमाणावर झाले असती मात्र प्रशासनाचा दिरंगाई व हलगर्जीपणाच उंची वाढीस कारणीभूत ठरत असल्याची ओरड होत आहे.मुर्दापूर लघुपाटबंधारे तलाव सन १९९७ मध्ये बांधण्यात आला. मुर्दापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे.त्यामुळे गेल्यावर्षी कमी पाऊस होवूनही धरण सध्याचा साठवण क्षमतेतच शंभर टक्के भरले. मात्र उंची वाढण्याचे काम ९५ टक्के झाले आहे पण केवळ पाच टक्के काम नऊ वर्षापासून रखडल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्यास अडचणी येतात. पाणी ओसंडून वाहत आहे. या धरणावर नशिराबादची पाणीपुरवठा योजना अवलंबून असून शेतीसाठीही याचा चांगला लाभ होणार आहे.अतिरिक्त भूसंपादन अद्याप झालेले नाही, अशी सबब सांगण्यात येते. भूसंपादनासाठी सुमारे २४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास सन २०१५मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मग काम रखडले कसे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत दखल घ्यावी व धरणाच्या उंची वाढीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या धरणाच्या सांडव्याच्या भिंतीचे २५ टक्के काम बाकी आहे. कारण उंची वाढीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त भूसंपादनाचे काम बाकी असल्याचे समजते. सन २०१०मध्ये वेग वर्धित सिंचन योजनेत या कामाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर निधी उपलब्ध झाल्याने कामास सुरुवात झाली. त्यामुळे या धरणाची सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे मात्र त्यानंतर अवघे पाच टक्के काम रखडले आहे. हे पूर्ण झाले तर पाणीसाठ्यात वाढ होणार असून त्यामुळे तेथील गावकऱ्यांना लाभ होणार आहे.जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील व सहकारी शेतकरी हे वारंवार उंची वाढीसंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र अनेकदा तक्रार करूनही अद्याप पाच टक्के उंचीचे काम रखडले असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.खोदकामामुळे जलसाठ्यात वाढमहामार्ग चौपदरीकरण व रेल्वे लाईनच्या कामासाठी याच धरणातून खोदण्याचे काम करण्यात आले त्यामुळे सुमारे एक ते दोन लाख घनमीटर धरणाची पाणी साठवण क्षमता वाढली आहे मात्र यंदा संततधार पाऊस व धानवड पिंपळे इथून झालेल्या धरणातील विसगार्मुळे मुर्दापूर धरण शंभर टक्के भरले असून ओसंडून वाहत आहे.

टॅग्स :riverनदीJalgaonजळगाव