मुक्ताईनगर (जि. जळगाव) - मुक्ताईनगर शहरात रविवारी बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय विश्रामगृहात सकाळी ९ वाजता चक्क बिबट्या आढळून आला. शहरात एकच खळबळ उडाली. वनविभागाचे पथक रेस्क्यू ऑपरेशन करीत असताना त्यांची बिबट्याशी झटापट झाली. झटापटीतच त्याला इंजेक्शन देत तीन तासांनंतर जेरबंद करण्यात आले.
- रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास विश्रामगृहाच्या डायनिंग हॉलच्या खाली, भिंतीच्या आडोशाला एक बिबट्या आढळून आला. शहरात बिबट्या आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली. - विश्रामगृहाला लागूनच असलेले बसस्थानक पूर्णपणे खाली करण्यात आले. तसेच विश्रामगृहाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. बाहेर असलेला गोंधळ पाहून दुपारी १२:३० वाजता बिबट्या विश्रामगृहातून धूम ठोकून पळाला.- विश्रामगृहातून तो थेट बसस्थानकाकडे पळाला. त्याच्यामागे वनविभागाचे पथक, आमदार आणि त्यामागे जमाव पळू लागला. शेवटी बसस्थानकाजवळच पथक आणि बिबट्या यांच्यात झटापट झाली.
Web Summary : A leopard caused panic in Muktainagar after being found in a rest house. Forest officials captured it after a three-hour struggle near the bus station, securing the area and dispersing crowds.
Web Summary : मुक्ताईनगर में एक विश्राम गृह में तेंदुआ पाए जाने से दहशत फैल गई। वन विभाग के अधिकारियों ने बस स्टेशन के पास तीन घंटे के संघर्ष के बाद उसे पकड़ लिया, इलाके को सुरक्षित कर दिया और भीड़ को तितर-बितर कर दिया।