शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

कोविडने वाढविला १०८ रुग्णवाहिकांचा धावण्याचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यू नेटवर्क जळगाव : दुसऱ्या लाटेत सर्वच यंत्रणांचे काम वाढले असून यात १०८ या रुग्णवाहिकेचाही समावेश आहे. या ...

लोकमत न्यू नेटवर्क

जळगाव : दुसऱ्या लाटेत सर्वच यंत्रणांचे काम वाढले असून यात १०८ या रुग्णवाहिकेचाही समावेश आहे. या रुग्णवाहिकेची नियमित असलेली धाव या दुसऱ्या लाटेत वाढली आहे. गेल्या दोन महिन्यात रुग्णवाहिकेला येणारे कॉल्स वाढले आहेत. एका दिवसात सरासरी ३५ कॉल्स हे केवळ कोविड रुग्णांसाठीचे येत असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हाभरात खासगी रुग्णवाहिकांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे. मात्र, जादा दरांमुळे बहुतांश रुग्णांकडून १०८ रुग्णवाहिकेलाच प्राधान्य दिले जाते. जिल्हाभरात ३५ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यात ९ ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट व २६ बेसिक लाईफ सपोर्ट प्रकारातील आहेत. पहिल्या लाटेत ३५ पैकी ९ रुग्णवाहिका या कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना होत्या. इतर रुग्णवाहिका या प्रसूती, सर्पदंश, अपघात विषप्राशन केलेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहचविण्यासाठी होत्या. मात्र, नंतर रुग्णसंख्या वाढल्याने आधी १४ व नंतर पूर्ण ३५ रुग्णवाहिका या सॅनिटाईझ करून कोविड, नॉन कोविड रुग्णांसाठी वापरल्या जात आहेत. यात आता कोविडचे कॉल वाढल्याचे माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ. राहुल जैन यांनी दिली. दरम्यान, हे कॉल गेल्या काही महिन्यांपूर्वी कमी झाले होते. मात्र, रुग्ण वाढताच त्यात वाढ झाली आहे.

कर्मचारी बाधित

पहिल्या लाटेत रुग्णवाहिकेचे चालक व डॉक्टरही बाधित झाले होते. यात ५ चालक, ४ डॉक्टर व एक सुपरवायझर यांना कोरोनाची बाधा झाली होती.

दिवसाला कोविडचे किती कॉल

३५ शहर व ग्रामीण भागातून

आजपर्यंत एकूण कोविड रुग्णांची वाहतूक

१४ हजार ६४७

तीन महिन्यांत ३ हजारांपेक्षा अधिक कॉल्स

गेल्या तीन महिन्यांत १०८ या रुग्णवाहिकेला कोविडसाठी ३ हजारांपेक्षा अधिक काल्स आले आहेत. महिन्याला सरासरी ९०० कॉल्स होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

अर्धा ते एक तास रुग्णवाहिकेची वेळ

कॉल केल्यानंतर अर्धा ते एक तासाच्या आत रुग्णवाहिका ही उपलब्ध होत असल्याची माहिती आहे. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका ही सध्या कोविड व नॉन कोविड दोनही सेवांसाठी वापरली जात आहे. या ३५ रुग्णवाहिका असून त्या आपत्कालीन सेवेला प्राधान्य देऊन वापरल्या जात आहेत.