फटका कारखान्याला जामनेरनजीक आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:24 IST2026-05-04T12:23:47+5:302026-05-04T12:24:11+5:30

पाळधीनजीक भवानी फाट्या जवळ राजकोटवाला फटका कारखाना आहे. सोमवारी सकाळी  आग लागल्याचे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले.

Fire hits factory near Jamner | फटका कारखान्याला जामनेरनजीक आग

फटका कारखान्याला जामनेरनजीक आग

- विनोद कोळी 

पाळधी( जि. जळगाव) : पाळधी ता.  जामनेरनजीक असलेल्या एका फटाका कारखान्यात सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली यात गोडाऊनमध्ये असलेले  लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले. सुदैवाने  यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

पाळधीनजीक भवानी फाट्या जवळ राजकोटवाला फटका कारखाना आहे. सोमवारी सकाळी  आग लागल्याचे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी जामनेर,  शेंदुर्णी आणि जळगाव येथून पाच ते सहा अग्निशमन बंब मागवण्यात आले होते. सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली.

Web Title : जामनेर के पास पटाखा फैक्ट्री में आग; कोई हताहत नहीं।

Web Summary : जामनेर, जलगाँव जिले के पास एक पटाखा फैक्ट्री में भीषण आग लग गई, जिससे लाखों के पटाखे जलकर राख हो गए। सुरक्षा गार्ड ने आग देखी, दमकल कर्मियों ने आग पर काबू पाया; कोई घायल नहीं हुआ।

Web Title : Fire engulfs firecracker factory near Jamner; no casualties reported.

Web Summary : A massive fire broke out at a firecracker factory near Jamner, Jalgaon district, destroying lakhs worth of crackers. Security guard noticed fire, and fire tenders brought it under control; no one was injured.