शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन विभागाकडे साधनांची वानवा

By admin | Updated: January 12, 2015 13:34 IST

अग्निशमन विभागाकडे आवश्यक असलेले साहित्य प्रशासनाने तातडीने खरेदी करावे. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी कर्मचार्‍यांची आहे.

 साहित्य पुरवण्याची मागणी

अग्निशमन विभागाकडे आवश्यक असलेले साहित्य प्रशासनाने तातडीने खरेदी करावे. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी कर्मचार्‍यांची आहे. आज विभागाकडे फक्त २ अँसबेस सूट आहेत. तर ब्रिडींग अँपट्रेस एकही नसल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षिततेत मोलाचा सहभाग घेणार्‍या अग्निशमन विभागाला आवश्यक साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. जळगाव : महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे आवश्यक साहित्यच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. आपत्कालीन परिस्थिती तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेकडून अग्निशमन विभागाची स्थापना करण्यात आली. कर्मचारी, वाहने, साहित्य, प्रशिक्षण, जागा या सर्व बाबींचा यात साहजिकच समावेश झाला. मात्र तांबापूरा येथे झालेली वायूगळती रोखण्यासाठी गेलेले कर्मचारीच बेशुद्ध होऊन रुग्णालयात भरती झाले. या पार्श्‍वभूमिवर अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांशी संवाद साधला असता, विभागाजवळ प्रशिक्षित कर्मचारी आणि साहित्यच उपलब्ध नसल्याचे उजेडात आले. आगीत सापडलेल्या नागरिकांची त्यातून सुटका करण्यासाठी कर्मचार्‍याला आवश्यक असलेला अँसबेस सूट, गमशूज, टॉर्च, फायरमन एक्स आणि फायर हुक विभागाकडे उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. चाळीस कर्मचार्‍यांचा ताफा असलेल्या अग्निशमन विभागाकडे फक्त पाच कर्मचारी प्रशिक्षित असल्याचेदेखील उघड झाले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाकडून नागरिकांचा बचाव होऊ शकतो का? असा प्रश्न विभागातील कर्मचार्‍यांकडूनच उपस्थित करण्यात आला आहे.