शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

जळगावात एक लाख नागरिकांचे पाणी दररोज वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 3:09 AM

पाणी असूनही शहराला तीन दिवसांआड पुरवठा; गळती दुरुस्तीची मोहीम हाती घेतली; मात्र वितरण व्यवस्था जुनीच

- अजय पाटील जळगाव : जळगाव शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळती व ‘लॉसेस’मुळे वाया जाते. एकीकडे पाणी दरवाढीबाबत शासनाचा विचार सुरू असताना दुसरीकडे दररोज वाया जाणाऱ्या या हजारो लिटर पाण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.शहराच्या लोकसंख्येनुसार दरडोई १३० लिटरप्रमाणे ७० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. शहराला वाघूर धरणावरून ९६ एमएलडी पाणी दररोज दिले जाते. शुद्धीकरण करून ७६ एमएलडी पाणी गिरणा टाकीत सोडले जाते. शुद्धीकरणादरम्यान २० एमएलडी पाण्याचा लॉस होतो, तसेच शहराला पाणीपुरवठा होत असताना गळत्यांचे प्रमाण प्रचंड आहे. जळगावात पाणी मुबलक असले तरी वितरण व्यवस्था ४० वर्षांपेक्षा जुनी आहे.मनपाच्या आकडेवारीनुसार शहरात ४०० हून अधिक ठिकाणी गळत्या आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यादरम्यान हजारो लिटर पाणी वाया जाते. परिणामी निर्धारित पाणी पोहोचत नाही.मनपाने गळती दुरुस्तीची मोहीम हाती घेतली; मात्र वितरण व्यवस्था जुनी असल्याने गळती दुरुस्त करूनही तीच परिस्थिती आहे.पाण्याची दरवाढ करण्यापेक्षा दररोज वाया जाणाºया पाण्याची बचत करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांना पाण्याचे मूल्य कळेल; पण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाया जाणाºया पाण्याचे मूल्य कोण करील.- बाळकृष्ण देवरे, पर्यावरणप्रेमीशहरातील गळत्यांवर मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा लॉस रोखण्यात यश आले आहे. अमृत योजनेचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यावर वाया जाणाºया पाण्यावर पूर्णपणे नियंत्रण येणार आहे.- अरविंद भोसले, प्रभारी मुख्य अभियंता,मनपा पाणीपुरवठा विभाग.5,39,000 जळगाव शहराची लोकसंख्या130 लिटर दरमाणसी पाण्याची गरज400 पेक्षा अधिक गळत्या70 दशलक्ष लिटर पाण्याची गरज96 एमएलडी पाणी वाघूर धरणातून

टॅग्स :water shortageपाणीकपात