वेळेत उपचार न मिळाल्याने रस्त्यातच महिला प्रसूत होऊन बाळाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 07:32 PM2019-11-09T19:32:48+5:302019-11-09T19:36:08+5:30

रस्त्यातच रुग्णवाहिके त बिघाड झाल्याने पर्यायी रुग्णवाहिकेसाठी वारंवार संपर्क साधूनही एकही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने वेळेत उपचार होऊ शकले नाहीत, त्यामुळे धामणगाव येथील महिलेची बिघाड झालेल्या रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली आणि त्यात तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी पहाटे ममुराबादजवळ घडली.

Due to lack of timely treatment, a woman lies in the road and baby dies | वेळेत उपचार न मिळाल्याने रस्त्यातच महिला प्रसूत होऊन बाळाचा मृत्यू

वेळेत उपचार न मिळाल्याने रस्त्यातच महिला प्रसूत होऊन बाळाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे रुग्णवाहिकेत बिघाड  पाच १०८ रुग्णवाहिका असताना एकही आली नाही सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार

जळगाव : रस्त्यातच रुग्णवाहिके त बिघाड झाल्याने पर्यायी रुग्णवाहिकेसाठी वारंवार संपर्क साधूनही एकही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने वेळेत उपचार होऊ शकले नाहीत, त्यामुळे धामणगाव येथील महिलेची बिघाड झालेल्या रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली आणि त्यात तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी पहाटे ममुराबादजवळ घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धामणगाव येथील खटाबाई चंद्रभान सपकाळे (२४) या महिलेला शनिवारी सकाळी ४ वाजता प्रसूतीसाठी १०८  रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवित असतांना वाटेतच ममुराबाद कृषी फार्मजवळ रुग्णवाहिकेत बिघाड झाला. पर्यायी रुग्णवाहिका मिळावी यासाठी कुटुंबिय तसेच रुग्णवाहिकेतील पारिचारिकेने तब्बल दोन तासात अनेकदा संपर्क साधूनही दुसरी  रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर वाहनातच तिची प्रसूती होवून बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेला खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 
खासगी वाहनाने विवाहिता व बाळाला जिल्हा रुग्णालयात ४.३० वाजता जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे पाज रुग्णवाहिका थांबलेल्या दिसल्या. त्यामुळे चंद्रभान सपकाळे यांनी  रुग्णवाहिकेजवळूनच १०८ वर पुन्हा संपर्क साधला असता तेव्हाही त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाले. यावेळी फोनवर बोलणाºया व्यक्तीला येथे पाच रुग्णवाहिका उपलब्धअसताना तुम्ही नाही का? सांगतात असा जाब विचारला असता समोरच्या व्यक्तीने फोन बंद केला.निष्पाप बाळाच्या मृत्यूला १०८ यंत्रणा जबाबदार असून संबंधितावर कारवाई व्हावी अशी मागणी चंद्रभान सपकाळे यांनी केली.

Web Title: Due to lack of timely treatment, a woman lies in the road and baby dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.