शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादला सांडपाण्यावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:16 IST

येथील सुसगाव रोड लगत असलेल्या दत्तनगर परिसरातील रहिवाशांचे सांडपाणी गेल्या सात ते आठ वर्षांपासून समर्थ कॉलनीला लागून असलेल्या मुख्य ...

येथील सुसगाव रोड लगत असलेल्या दत्तनगर परिसरातील रहिवाशांचे सांडपाणी गेल्या सात ते आठ वर्षांपासून समर्थ कॉलनीला लागून असलेल्या मुख्य गटारीकडे वाहत होते. या पाण्याला नैसर्गिक उतार तिकडेच होता; मात्र दत्तनगर गटाराचे सांडपाणी दुसऱ्या गटात नको, या मानसिकतेतून वाद उद्‌भवला. त्यातच एका गटातील रहिवाशांनी मातीचे डंपर टाकून पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला. दत्तनगर रहिवाशांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दिली; मात्र ग्रामपंचायतीचे प्रशासक व अधिकाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली. रहिवाशांच्या बाथरूममध्ये पाणी तुंबले. पुढे हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. सांडपाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे; मात्र ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ठणठणाट आहे. वार्डाचे पदाधिकारी नाही. अखेर लालचंद पाटील यांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे इंजिनियर बोलावून मोजमाप केले व तातडीने टेंडर मंजूर करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. गटारीची आखणी करण्यात आली असून, शुक्रवारपासून कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.