शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

कानबाईच्या विसर्जनावेळी झालेला वाद बेतला जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:33 IST

शिवाजीनगरातील तरुणाचा सुरतमध्ये खून : दुचाकीवरून आले होते हल्लेखोर

जळगाव : शिवाजीनगरातील खडके चाळ परिसरात वास्तव्यास असलेला रितेश सोमनाथ शिंपी (वय-१८) याचा सोमवारी सुरतमधील दिंडोली येथे कानबाईच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना अज्ञात युवकांशी वाद झाला़ त्यानंतर त्या अज्ञात युवकांनी रितेश याच्या पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले़ दरम्यान, मंगळवारी पहाटे रूग्णालयात उपचार घेत असताना प्राणज्योत मालवली़ दरम्यान, याप्रकरणी दिंडोली पोलीस ठाण्यात अज्ञात युवकांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़रितेश शिंपी हा शिवाजीनगरातील खडकेचाळ परिसरात आई-वडील तसेच मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता़ तर शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता़ रविवारी आणि सोमवारी कानुबाईचा उत्सव असल्यामुळे रितेश हा सुरतमधील दिंडोली येथील मावशीकडे रविवारी सकाळी आला होता़ कानुबाईचा उत्सव झाल्यानंतर सोमवारी विसर्जन मिरवणूक होती़त्यामुळे सोमवारी सकाळी रितेश हा नातेवाईकांसह कानुबाईच्या मिरवणुकीत सहभागी झाला होता़दरम्यान, दुपारच्या सुमारास मिरवणुकीत नाचत असताना रितेश याची दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात युवकांशी धक्काबुक्की झाली़ त्यामुळे वाद होऊन बाचाबाची झाली़अन् पोटात खोलवर रूतवला चाकूरितेश आणि त्या दोन युवकांमध्ये वाद झाल्यानंतर हाणामारी झाली़ आणि कुणाला कळण्याच्या आतच दोन युवकांमधील एकाने चाकूने रितेशच्या पोटात वार केला़ वार इतका जबर होता की, चाकू पोटात खोलवर रूतल्यामुळे चाकूसहीत रितेश यास रूग्णालयात हलविण्यात आले़मंगळवारी पहाटे मृत्यूपोटात खोलवर चाकू रूतल्यामुळे रितेश हा गंभीर जखमी होता़ त्यातच प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते़ दरम्यान, मंगळवारी रितेश याचा उपचार घेत असताना मृत्यू झाला़ याप्रकरणी सुरतमधील दिंडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तसेच प्रेम प्रकरणातून या युवकांकडून रितेश याच्यावर हल्ला करण्यात आला असल्याची मात्र, चर्चा ऐकण्यात आली आहे़ रितेश याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव