शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

लग्न समारंभाला आलेल्या दिल्लीच्या महिलेची पर्स लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 21:23 IST

जळगाव - पिंप्राळा परिसरात दीराच्या लग्न समारंभासाठी आलेल्या नवी दिल्ली येथील माधुरी नीलेश केदारे यांची रोख रक्कम व सोन्याचे ...

जळगाव- पिंप्राळा परिसरात दीराच्या लग्न समारंभासाठी आलेल्या नवी दिल्ली येथील माधुरी नीलेश केदारे यांची रोख रक्कम व सोन्याचे दागिन असे एकूण २ लाख ४७ हजार रूपयांचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे़ ही घटना १२ नोव्हेंबर रोजी मानराज पार्कजवळील श्रीराम मंदीर संस्थानच्या मैदानावर घडली आहे़ याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़माधूरी केदारे या नवी दिल्ली येथे पती नीलेश व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत़ त्यांचे पती हे महाराष्ट्र सदनात सहाय्यक लेखाअधिकारी म्हणून कार्यरत आहेत. माधुरी यांचे सासरे शहरातील कृष्णा पार्क शिवधाम मंदिराच्या मागे राहतात. १२ नोव्हेंबर रोजी माधुरी यांचे दीर नुपेश केदारे याचा लग्नसमारंभ होता. मानराज पार्क परिसरातील श्रीराम मंदीर संस्थेचे परिसरातील मैदानावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी माधुरी या २७ आॅक्टोबर रोजी जळगावात आल्या होत्या. तसेच लग्न सोहळ्यानिमित्त माधुरी केदारे यांनी कानातले तीन तोळ्याचे झुमके, दहा गॅ्रंमचे मंगळसूत्र व टाप्स असे सोन्याचे दागिणे घेतले होते. तसेच जळगावातून चार ग्रॅमचे मणीमंगळसूत्र व नाकातील फुली, दोन भार वजनाचे चांदीचे जोडवे अशा वस्तू घेतल्या. ही सर्व दागिणे माधुरी यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवल्या होत्या़अर्धा तासात चोरट्यांचा डल्लामाधुरी केदारे या पती नीलेश व इतर नातेवाईकांसोबत सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास वरातीसोबत मंडपात आल्या. याठिकाणी खुर्चीवर बसल्या. दागिणे तसेच रोकड असलेली पर्स खूर्चीखाली ठेवली. ८ वाजेच्या सुमारास पर्स बघितली असता, आढळून आली नाही. वडीलासोबत शोध घेवूनही ती मिळून आली. या पर्समध्ये ९० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅमचे सोन्याचे झुमके, ९० हजार रुपयांचा ३० ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, ३० हजार रुपयांचे १० ग्रॅम सोन्याची मणिपोत, २० हजाराचे ४ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व नाकातील फुली, १ हजार रुपयांचे २ भारचे चांदीचे जोडवे व १६ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ४७ हजाराचा ऐवज होता. चोरीची खात्री झाल्यावर माधुरी केदारे यांनी दुसऱ्या दिवशी रामानंद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक रोहीदास ठोंबरे करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव