शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

तापी नदीत शेतकऱ्याचा मृतदेह तरंगताना आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 13:49 IST

धुरखेडा येथील तापी नदीच्या काठावर एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.

ठळक मुद्देमृतदेह तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले शेतकरी देविदास बोदडे यांचा.

लोकमत न्यूज नेटवर्करावेर : तालुक्यातील धुरखेडा येथील तापी नदीच्या काठावर एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. अखेर  मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले शेतकरी देविदास राजाराम बोदडे ( ५२) यांचा तो मृतदेह असल्याची ओळख त्यांच्या शोधात असलेल्या नातेवाईकांना पटली. याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील धुरखेडा येथील तापी नदीकाठी एका अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगतांना आढळून आल्याची खबर संबंधित पोलीस पाटील यांनी रावेर पोलिसात दिली. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पो. हे. काॅ. जितेंद्र नारेकर, पो. ना. महेंद्र सुरवाडे, पो. कॉ. म्हस्के आदी घटनास्थळी पोहोचले.   त्यांनी धुरखेडा येथील मच्छीमारीचा व्यवसाय असलेले ज्ञानेश्वर बेलदार व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत मृतदेह बाहेर काढला.नातेवाईक आले धावूनदरम्यान, संबंधित पोलीस पाटील व पोलीसांनी नदीकाठच्या गावात व्हाॅट‌्सअप ग्रुपवर  फोटाे व माहिती टाकली असता मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील तीन दिवसांपासून घराबाहेर निघून गेलेल्या शेतकर्‍याच्या शोधात असलेले त्यांचे भाऊ व मुले घटनास्थळी  धावतच आले. त्यांना मृतदेहाची ओळख पटली, त्यांनी एकच आक्रोश केला. बेलसवाडी येथील शेतकरी देविदास राजाराम बोद हे  ४ डिसेंबर रोजी दुपारी शेतीकाम आटोपून घरी आले असता त्यांनी घरात रेशनचे धान्य आणले व सायंकाळी बाहेरून फिरून येतो, असे सांगितले होते. दरम्यान ते घरी न परतल्याने त्यांचा शौचविधीसाठी गेल्याने पाय निसटून तापीनदीत बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज त्यांच्या आप्तेष्टांकडून वर्तवण्यात येत आहे.गत तीन दिवसांपासून मयत देविदास राजाराम बोदडे यांचा मृतदेह तापी नदीत बुडून तरंगत धुरखेडा येथील तापीनदी तीरावर येईपर्यंत  तीन  दिवसात पाण्यात फुगून छिन्न विच्छिन्न झाल्याने रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले.याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र नारेकर हे करीत आहेत. 

टॅग्स :RaverरावेरDeathमृत्यूFarmerशेतकरी