शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:34 IST

Jalgaon Accident news: आईसोबत गावी निघालेल्या एका तरुणावर काळाने वाटेतच झडप घातली. नोकरी लागल्याचा आनंदात घरी निघालेल्या तरुणाच्या मृत्यूने गावावरही शोककळा पसरली. 

Maharashtra News: नाशिक येथे नोकरी मिळाल्यानंतर आईसह गावी परतत असताना रेल्वेतून पडून आनंदा अशोक रजाने (वय ३३, रा. निंभोरा, ता. रावेर) या तरुणाचा मृत्यू झाला. रेल्वेत आई त्याची वाट पाहत राहिली... पण काही वेळातच मुलाचा मृतदेहच तिच्या नजरेस पडला! ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (६ जून) सकाळी आसोदा शिवारात घडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

निंभोरा येथील आनंदा रजाने हा तरुण नाशिक येथे मामाकडे आईसह कामाच्या शोधात गेला होता. तेथे एका कंपनीत त्याला नोकरी मिळाली.

अवघ्या आठवडाभराच्या कामानंतर तो शुक्रवारी सकाळी आईसह गावी परतण्यासाठी रेल्वेने भुसावळ मार्गे निघाला. मात्र प्रवासातच, आसोदा शिवाराजवळ अचानक तो धावत्या रेल्वेतून खाली पडला.

भुसावळ स्थानकावर उतरल्यावर तिने घटना रेल्वे अधिकाऱ्यांना कळवली. तिची व्यवस्था जळगावला परत करण्यात आली आणि येथे आल्यानंतर तिने रेल्वे सुरक्षा बलाला घटनेची माहिती दिली. शोध घेतल्यानंतर आनंदाचा मतदेह सापडला. 

क्षणभरात घेतलेला निर्णय ठरला जीवघेणा

आनंदा व त्याची आई हे भुसावळपर्यंत रेल्वेने प्रवास करत होते. त्याआधीच जळगाव रेल्वे स्थानक आले होते. आनंदाने आईला उतरावं का विचारलं, मात्र आईने सांगितलं की, "हे जळगाव आहे, आपल्याला पुढे भुसावळला जायचंय." काही क्षणातच आनंदा अचानकपणे खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

आनंदा घरात एकुलता मुलगा

आनंदा रजाने हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे दोन विवाहित बहिणी आहेत. अवघ्या आठवडाभराची नोकरी, त्यानंतर गावी परतताना झालेला दुर्दैवी मृत्यू आणि आईच्या डोळ्यांसमोर घडलेली ही घटना संपूर्ण गावात हळहळ निर्माण करणारी ठरली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेDeathमृत्यूPoliceपोलिस