शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्यावर एमपीडीए लावता का?' जुन्या वादातून तरुणाला पाठलाग करुन संपवलं, बाईकवरुन पाडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:46 IST

जळगावात पूर्ववैमनस्यातून एका २६ वर्षीय तरुणाची पाठलाग करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

Jalgaon Crime: जळगाव  शहरातील रामेश्वर कॉलनीत एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करणअयात आल्याने खळबळ उडाली आहे.  २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दीक्षित वाडी शेजारील महावितरण कार्यालयाजवळ निघृण हत्या करण्यात आली. वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या ६ ते ७ हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी विशालवर वार करून त्याचा जीव घेतला.  याप्रकरणी पोलिसांनी ६ ते ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.

मयत विशालचा चुलत भाऊ आकाश जनार्दन मोची याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. फिर्यादीनुसार आकाश आणि विशाल दोघेही काशीबाई उखाजी शाळेजवळ वेल्डिंगच्या दुकानात काम करतात. रविवार, १७ ऑगस्ट रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास आकाश, विशाल आणि त्यांचा मित्र रोहित भालेराव हे  घरासमोर गप्पा होते. वीजपुरवठा खंडित झाल्याने तिघेही मोटारसायकलने महावितरण कार्यालयाकडे तक्रार देण्यासाठी निघाले. दीक्षितवाडी येथील जिम समोरून जात असतानाच भूषण मनोज अहिरे, पवन उर्फ बद्या दिलीप बावीस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर आणि त्यांचे इतर ३ ते ४ साथीदार वाढदिवस साजरा करत उभे होते. विशाल आणि त्याचे मित्र बाईकवरुन जाताना पाहताच या टोळक्याने त्यांचा पाठलाग केला.

६ ते ७ हल्लेखोरांनी तिघांनाही गाठलं आणि विशालवर हल्ला केला.  त्यावेळी विशाल सोबत असलेले आकाश आणि रोहित घाबरून पळू गेले. हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूने वार केले. त्यानंतर ते तिथून पळून गेले. त्यानंतर आकाशने तत्काळ त्याच्या घरच्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर विशालचे वडील, भाऊ, आई आणि चुलते महावितरण कार्यालयाजवळ पोहोचले आणि त्यांनी विशालला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून विशालला मृत घोषित केले.  या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती.  मात्र त्यानंतर दुपारी नातेवाईकांनी विशालचा मृतदेह ताब्यात घेतला आणि कारवाईची मागणी केली.

पाठलाग करत महावितरण कार्यालयाच्या गेटजवळ पोहोचताच भूषण अहिरे, पवन, आकाश उर्फ खंड्या ठाकूर आणि त्यांच्या साथीदारांनी बाईकवर मागे बसलेल्या विशाल मोचीला खाली ओढले. त्यानंतक खंड्या, बद्या आणि भूषण यांनी चाकूने आणि इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी विशालला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हल्लेखोर 'आम्ही भूषण भाचाचे साथीदार आहोत. आमच्यावर एमपीडीए लावता का, मारूनच टाकतो' असे ओरडत होते. त्यांनी विशालच्या मानेवर, छातीवर आणि डोक्यावर चाकूने गंभीर वार केले, ज्यामुळे तो जागीच कोसळला.

दरम्यान, आकाश मोचीच्या जबाबानुसार, आरोपी पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर आणि भूषण मनोज अहिरे यांना तो ओळखतो. २०१२ मध्ये आकाश आणि त्याचा मित्र रोहित भालेराव यांच्यासोबत आरोपींचा वाद झाला होता. तसेच, विशाल आणि त्याचे मित्र संबंधित असल्याने, आरोपींचा त्यांच्यावर राग होता. याच जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात भूषण मनोज अहिरे, पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर, आकाश उर्फ बंड्या सुखलाल ठाकूर याच्यासह ६ ते ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस