शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

लग्न झालं, वऱ्हाड निघालं, गाडी थांबली अन् वधू पळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST

दीपक ढोले जालना : मुलींचे प्रमाण कमी झाल्याने बहुतांश तरुणांना वधू मिळणे कठीण झाले आहे. वधू मिळण्यासाठी वर कितीही ...

दीपक ढोले

जालना : मुलींचे प्रमाण कमी झाल्याने बहुतांश तरुणांना वधू मिळणे कठीण झाले आहे. वधू मिळण्यासाठी वर कितीही पैसे मोजण्यासाठी तयार असतात. त्यातून त्यांची फसवणूक झाल्याच्या काही घटनासमोर आल्या आहेत. अशीच फसवणूक गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील तीन तरुणांची झाली. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील तीन मुलींनी वकिलाकडून बॉन्ड करून या तीन तरुणांशी ७ जानेवारी कायदेशीर रोजी लग्न केले. त्यानंतर ८ जानेवारीला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तीन वर, तीन वधू व अन्य एक व्यक्ती एका कारने गुजरातकडे निघाले. जालना शहराजवळील नागेवाडी येथे आल्यावर मुलींनी लघुशंकेचे निमित्त करत गाडी थांबयाला लावली. त्यानंतर या तीनही मुली तीन मोबाईल, रोख रक्कम ३० हजार असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाल्या.

याप्रकरणी गुजरात येथील पियुष शांतीलाल यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुजरात येथील पियुष शांतीलाल वसंत (रा. जुनागड) यांच्या तीन मित्रांचे लग्न जमत नव्हते. त्यांनी वसंत यांना मुलगी पाहण्यास सांगितले. जालना येथील मित्र पाशाभाई (पूर्ण नाव माहीत नाही) याला फोन करून मुलींबाबत विचारणा केली. त्याने वसंत यांना २ जानेवारी रोजी जालना येथे बोलावून घेतले. त्यानंतर तीन मुलांसह ते देऊळगाव येथे गेले. तेथील एका महिलेने तीन मुली दाखविल्या. तिन्ही तरुणांनी लग्न करण्यास होकार दिला. त्यानंतर पियुष वसंत हे आपल्या मित्रांसोबत जालना शहरातील एका हॉटेलवर थांबले. लग्नासाठी खरेदी केली. ७ जानेवारी रोजी वकिलाकडून बॉन्ड करून तिन्ही मुलींशी कायदेशीर लग्न केले. आम्ही आईकडे जाऊन येतो, असे म्हणून मुली देऊळगावराजा येथे निघून गेल्या. ८ जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्या परत आल्या. त्यानंतर तीन मुली, अन्य एका व्यक्तीसह वाहनाने गुजरातकडे निघाल्या. जालना - औरंगाबाद रोडवरील नागेवाडी येथे आल्यावर मुलींनी लघुशंकेचे निमित्त करत गाडी थांबवायला लावली. अंधाराचा फायदा घेऊन मुली फरार झाल्या. पियुष वसंत यांनी संबंधित महिलेला फोन करून मुली पळून गेल्याचे सांगितले असता, त्या महिलेने त्यांनाच धमकी दिली. तुम्ही पळून जा, नाहीतर तुम्हाला बघून घेईन, असे ती म्हणाली. यानंतर पियुष वसंत यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री चंदनझिरा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक रेणुका वाघ करीत आहेत.

गुजरात येथील तीन तरुणांना लग्नाचे अामिष दाखवून फसवले आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, त्यांना तातडीने अटक करू.

श्यामसुंदर कौठाले, पोनि. चंदनझिरा, पोलीस