दोन बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:30 IST2020-12-31T04:30:57+5:302020-12-31T04:30:57+5:30

हसनाबाद : वैद्यकीय परीक्षेत जवखेडा (दानवे) येथील प्रदीप पंडितराव पुंगळे याने ५२० गुण प्राप्त करून यश प्राप्त केले आहे. ...

Two news | दोन बातम्या

दोन बातम्या

हसनाबाद : वैद्यकीय परीक्षेत जवखेडा (दानवे) येथील प्रदीप पंडितराव पुंगळे याने ५२० गुण प्राप्त करून यश प्राप्त केले आहे. प्रदीपची आता एमबीबीएससाठी सिंधुदुर्ग येथील एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली आहे. याबद्दल प्रदीपचे भास्कर दानवे, सुधाकर दानवे, रमेश दानवे, माणिक दानवे आदींनी स्वागत केले आहे.

--------------

दोन जणांची मल्टिनॅशनल कंपनीत निवड

अंबड : शहरातील शासकीय तंत्रनिकेतनमधून शैक्षणिक वर्ष २०१९- २० मध्ये यंत्र अभियांत्रिकीची पदविका प्राप्त करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड झाली आहे. यात यंत्र विभागाच्या मनोहर डोंगरे व सौरभ जगताप या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी संस्थेचे माजी प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी एस. आर. पाटील, प्रभारी प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी के. बी. दंडे यांनी विशेष प्रयत्न केले. प्राचार्य डॉ. ए. एम. जिंतूरकर यांनी दोघांचेही स्वागत केले.

Web Title: Two news