माळशेंद्रा येथे सरपंच निवडीदरम्यान तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:19+5:302021-02-13T04:30:19+5:30

माळेशंद्रा येथील हे गाव संवेदनशील आहे. यापुवीर्ही ही येथे निवडणुकीदरम्यान, अनेकदा वादा-वादी झाली होती. शुक्रवारी सरपंच निवडीसाठी दुपारी ...

Tensions during Sarpanch election at Malshendra | माळशेंद्रा येथे सरपंच निवडीदरम्यान तणाव

माळशेंद्रा येथे सरपंच निवडीदरम्यान तणाव

माळेशंद्रा येथील हे गाव संवेदनशील आहे. यापुवीर्ही ही येथे निवडणुकीदरम्यान, अनेकदा वादा-वादी झाली होती. शुक्रवारी सरपंच निवडीसाठी दुपारी २ वाजेपासून पुढे प्रक्रिया सुरु झाली होती. सर्व सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून हातवर करुन निवड प्रक्रिया पार पडली. परंतु, अगोदरच या गावात दोन गट पडून ही निवडणूक तणावाची झाली होती. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पार पडत असतांना अचानक झालेल्या गोंधळामुळे एक गट ग्रामस्थांवर चालून गेला. परंतु, यानंतर ग्रामस्थांना गावापेक्षा बाहेरगावचे जास्त तरुण दिसल्यामुळे ग्रामस्थांनी एक होऊन लाकडी दंडुके बाहेर काढले. गाव आक्रमक झाल्याचे पाहताच बाहेरगावहून आलेले तरुण मात्र, आपापली वाहने दिसेल त्या गल्लीने बाहेर काढून गावातून पळ काढला. आमच्या अधिकारी, कर्मचाºयांनी केलेली व्हिडीओ शुटींग पाहणार आहे. यात गावातील कोण व गावाबाहेरचे कोण याबाबत ओळख पटवून कारवाई केली जाणार आहे. या काळात गावाबाहेरील लोकांना जाणे प्रतिबंध असतोच. शुटींगमधून पाहणी करुन अशांवर कारवाई केली जाणार आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी सांगितले.

Web Title: Tensions during Sarpanch election at Malshendra