शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग पोलिसांकडून दहा हजार चालकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:51 IST

महामार्ग पोलिसांनी चालू वर्षात १० हजार ९४८ वाहन चालकांवर कारवाई करून १५ लाख ७८ हजार रूपयांचा दंड आकारला आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील महामार्ग पोलिसांनी चालू वर्षात १० हजार ९४८ वाहन चालकांवर कारवाई करून १५ लाख ७८ हजार रूपयांचा दंड आकारला आहे. महामार्ग विभागाच्या नव्या अध्यादेशानुसार आता राष्ट्रीय, राज्य महामार्गावर ठरवून दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालविणाऱ्या चालकांवरही धडक कारवाई मोहीम हाती घेतली जाणार आहे.जालना - औरंगाबाद, जालना- अंबड, जालना- देऊळगाव राजा, जालना- मंठा, जालना- सिंदखेडराजा, जालना- भोकरदन या राज्य व जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहने चालविताना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे, याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते. महामार्ग विभागाच्या वतीने याबाबत नव्याने अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून वाहने चालविताना कारसाठी प्रति तास ९० किमी., जीप व मालवाहतूक वाहनांसाठी प्रति तास ८० किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर दुचाकीसाठी प्रति तास ७० किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर राज्य महामार्गावर कारसाठी प्रति तास ७० किमी., जीप, दुचाकी व मालवाहतूक वाहनासाठी प्रति तास ६० किमीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहन चालक वेग मर्यादा ओलांडून वाहने चालवित असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.चालू वर्षात जिल्ह्यातील राज्य मार्गावर ७० प्राणांतिक अपघात झाले आहेत. यात ७९ जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर प्रवासी गंभीर जखमी झालेले ६६ अपघात आहेत. यात ९६ प्रवासी, चालक गंभीर जखमी झाले आहेत. असे एकूण १३६ अपघात झाले आहेत. वाहतूक नियमांचे विशेषत: वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आता वेगमर्यादा ओलांडणाºया वाहन चालकांविरूध्द कारवाईची धडक मोहीम हाती घेण्याचा निर्धार केला आहे.ब्लॅक फिल्मची ४१ प्रकरणेमहामार्गा पोलिसांनी चालू वर्षात मर्यादेपेक्षा अधिकची ब्लॅक फिल्म बसविणा-या ४१ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तर ओव्हरस्पीड प्रकरणात केवळ चार चालकांवर कारवाई झाली आहे. मात्र महामार्ग विभागाच्या नवीन अध्यादेशानुसार व मिळालेल्या यंत्रणेचा वापर करून वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad transportरस्ते वाहतूकbikeबाईकcarकार