शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जालन्यात सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला

By विजय मुंडे  | Updated: April 2, 2025 11:37 IST

पोलिसांचे पथक फरार सुनेच्या मागावर आहे.

जालना: शहरातील भोकरदन नाका येथे सुनेने सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटे भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.सविता संजय शिनगारे ( ४५) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितल्या नुसार, प्रियदर्शनी कॉलनी येथे सविता शिनगारे या सून प्रतीक्षा शिनगारे यांच्यासोबत किरायच्या घरात राहत. सविता यांचा मुलगा लातूर येथे नोकरीनिमित्त राहत असल्याने घरी सासू आणि सून दोघीच होत्या. कौटुंबिक वादातून बुधवारी पहाटे सुनेने सासूच्या डोक्यात जोरदार वार केला. यातच सासू सविता यांचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रतिक्षाने मृतदेह पोत्यात भरून घराबाहेर आणला. मात्र, घर मालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. तोपर्यंत प्रतीक्षा मृतदेह सोडून फरार झाली होती. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, एलसीबीचे पोनि. पंकज जाधव, सदरबाजार पोलिस ठाण्याचे पोनि. संदीप भारती व इतरांनी भेट देवून पाहणी केली.

मृतदेह विल्हेवाट लावण्याचा होता हेतू
सून प्रतीक्षा यांनी सासू मृत्युमुखी पडल्याचे पाहताच मृतदेह पोत्यात भरला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने पोते घराच्या बाहेर काढत असताना प्रतिक्षाला घर मालकाने पाहिले. पोते अवजड असल्याने प्रतिक्षाला ते बाहेर नेता आले नाही. यातच घर मालकाला संशय आल्याचे लक्षात येताच प्रतीक्षा तेथून फरार झाली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमऱ्यांचे फुटेज घेतले आहेत. आरोपीच्या शोधार्थ एलसीबी आणि सदरबाजार पोलिस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना