शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे रोजी ; विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासोबतच शुल्क भरण्यासाठी ३० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली ...

या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासोबतच शुल्क भरण्यासाठी ३० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपुष्टात आल्याने शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आल्या असून, संकेतस्थळावर याविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा यंदा मे महिन्यात एकाच वेळी घेतली जाणार असून या परीक्षेसाठी अद्याप ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करण्यात आलेले नाहीत, त्यांचे अर्ज १० एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येणार आहे.

अर्ज करण्याचे आवाहन

कोरोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने ही परीक्षा मे महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर होण्यासही विलंब झाला होता. यंदाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावेत असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील वर्षी जालना जिल्ह्यात १० हजार ६८४ पाचवी, तर आठवीच्या ७ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी पाचवीचे २ हजार १२७ तर आठवीचे ८६२ विद्यार्थी पात्र ठरले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पाचवीचे २७६, आठवीचे २,८७८ आहेत. जिल्ह्यातील पाचवीसाठी ७५ तर आठवीसाठी ६१ केंद्रांवर परीक्षा पार पडली होती. यंदाही अधिकचे विद्यार्थी परीक्षा देतील असा विश्वास शिक्षणाधिकारी कार्यालयाने व्यक्त केला आहे.

असा करावा अर्ज

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १० एप्रिलपर्यंत मुदत वाढ मिळाली आहे. शिक्षकांनी डब्लूडब्लूडब्लू डॉड एमएसईपुणे डॉट इन आणि डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपीयूपीपीएसएस डॉट इन या वेबसाईटवर भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.