शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हरच्या विळख्यात सातबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:59 IST

आॅनलाईन सात बारा निघत नसल्यामुळे शेतकरी सेतू -सुविधा तासन्तास तात्काळ राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांनीसंताप व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : गेल्या चार दिवसांपासून महाअभिलेखचा आॅनलाईन सातबारा उतारा मिळण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. आॅनलाईन सात बारा निघत नसल्यामुळे शेतकरी सेतू -सुविधा तासन्तास तात्काळ राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांनीसंताप व्यक्त केला.प्रशासन गतीमान करण्यासाठी शासनाने पेपरलेस काम करण्याचा निर्णय घेतला यात शेतक-यांना आॅनलाईन सात बारा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, ही प्रणाली सुरळीत चालावी याकरीता आवश्यक ती उपाययोजना वेळीच घेतली जात नसल्यामुळे आॅनलाईन सातबाराचा बोजवारा उडाला आहे़ शेतकºयांना खरेदी विक्रीचे व्यवहार, विविध शासकीय कार्यालयातील अनुदानीत योजना, बँकेचे नवीन कर्ज,जुन्या कर्जाचे पुर्नगठण, विविध प्रमाणपत्रे अशा अनेक शासकीय कामांसाठी आॅनलाईन सातबाराची आवश्यकता असते़त्यासाठी शेतकरी महाईसेवा किंवा अन्य केंद्रांमध्ये जातात व आॅनलाईन सातबारासह अन्य आवश्यक असणारी कागदपत्रे काढतात मात्र आॅनलाईन निघणारे सातबाराचे उतारे गेल्या शनिवारपासून निघत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.शेतक-यांना सातबारा उतारा विविध शासकीय कार्यालयातील कामकाजासाठी उपयोगी पडतो. तालुका कृषि,भूमी अभिलेख, रजिस्ट्री, वनविभाग, अशी अनेक शासकीय कार्यालये आहेत तसेच शेजारीच न्यायालय,पंचायत समिती कार्यालय आहे़ही सर्व शासकीय कार्यालये शहरापासून दोन ते तीन की. मी. अंतरावर आहेत़शेतक-याना यापैकी अनेक कार्यालयांमधे सातबारा उतारा द्यावा लागतो. यामुळे शेतक-यांना चकरा माराव्या लागत आहे. यामुळे तहसील कार्यालयात सातबारा मिळण्याची सुविधा करावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.लवकरच मिळेल सातबारातांत्रिक अडचणीमुळे आॅनलाईन सातबार मिळण्यास शेतक-यांना अडचणी येत आहे. यावर युध्द पातळीवर काम करण्यात येत आहे. काही दिवसातच शेतकºयांना आॅनलाईन सातबारे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.अशी माहिती तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले.

टॅग्स :onlineऑनलाइनFarmerशेतकरीRevenue Departmentमहसूल विभाग