निधी संकलनासाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:16+5:302020-12-29T04:29:16+5:30

वाहतुकीची कोंडी जालना : जुना जालना भागातील गांधी चमन ते कचेरी रोड भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. अनेक ...

Meeting for fundraising | निधी संकलनासाठी बैठक

निधी संकलनासाठी बैठक

वाहतुकीची कोंडी

जालना : जुना जालना भागातील गांधी चमन ते कचेरी रोड भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वाहन चालक रस्त्यावर वाहने लावत आहेत. शिवाय वाहतूक सिग्नल यंत्रणाही सुरळीत चालत नाही. त्यामुळे अनेक चालक नियम मोडून वाहने चालवित असून, याचा पादचारी नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

वन्य प्राण्यांमुळे रब्बीतील पिकांचे नुकसान

भोकरदन : तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आली आहेत. पिकावरील अळी, कीड नियंत्रण करून शेतकरी ही पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, सध्या हरभरा, गहू, ज्वारी आदी पिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठे नुकसान केले जात आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Web Title: Meeting for fundraising