शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

अंतरवालीत साखळी उपोषण, मुंबईत देणार धडक; मनोज जरांगेंनी आंदोलनाची दिशा बदलली

By विजय मुंडे  | Updated: February 8, 2025 11:27 IST

आम्ही मुंबईतही आंदोलन करणार असून, त्यासाठी आझाद मैदान, शिवाजी पार्कच्या जागेची पाहणी केली जाणार: मनोज जरांगे

जालना : उपोषण सोडून १२-१३ दिवस झाले तरी दिलेल्या आश्वासनातील एकाही आश्वासनाची शासनाने पूर्तता केलेली नाही. उपोषण सोडविताना आश्वासने द्यायची आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष करायचे, असे शासनाचे सुरू आहे. त्यामुळे आता अंतरवाली सराटीत १५ फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण साखळी उपोषण सुरू होणार असून, त्याचे लोण राज्यभरात पसरणार आहे. आम्ही मुंबईतही आंदोलन करणार असून, त्यासाठी आझाद मैदान, शिवाजी पार्कच्या जागेची पाहणी केली जाणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, दस्तावेज अभ्यासासाठी अभ्यासकाची नियुक्ती करावी, गॅझेट लागू करावे, एसीबीसीच्या विषयावर निर्णय घेणे अशा पाच ते सहा मागण्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आ. सुरेश धस यांच्या मार्फत दिले होते. परंतु, उपोषण सोडून १२ ते १३ दिवस झाले तरी एकही मागणी मान्य केलेली नाही, असे जरांगे म्हणाले.

मुंबईत धडक, राज्यभर आंदोलन
पहिल्या कॅबिनेटमध्ये मागण्यांवर काहीही झालेल नाही आता होणाऱ्या दुसऱ्या कॅबिनेटमध्ये काय होईल हे माहिती नाही. आम्ही आमच्या मागण्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. परंतु, त्यापूर्वी अंतरवाली सराटीत आता साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. राज्यातील गावा-गावात हे आंदोलन उभा राहणार आहे. शांततेचे आंदोलन काय असते हे मुख्यमंत्र्यांना यावेळी पहायला मिळेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना