शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: वाळू माफियांना दणका! शिंदेसेनेच्या अंबड तालुकाप्रमुखासह ४ जणांवर 'MPDA' कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:30 IST

जालन्यात वाळू माफियांवर जिल्हाधिकाऱ्यांचा 'MPDA' स्ट्राईक! ४ जणांना १ वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश

- पवन पवार 
वडीगोद्री (जालना):
जालना जिल्हाधिकारी आशीमा मित्तल यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळू माफियांविरुद्ध अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. अंबड तालुक्यातील गोदावरी पात्रातून कोट्यवधी रुपयांची वाळू तस्करी करणाऱ्या आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ४ जणांवर 'MPDA' (स्थानबद्धता) अंतर्गत १ वर्षासाठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेऊन हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली असून, उर्वरित तीन जण फरार आहेत.

कोण आहेत ते वाळू माफिया? 
स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये पंकज सोळुंके, सचिन उर्फ गजानन सोळुंके (दोघे रा. गोंदी), केशव वायभट (अंकुशनगर) आणि समीर पठाण (दुनगाव) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पंकज सोळुंके हे शिवसेनेचे अंबड तालुकाप्रमुख असून जिल्हा परिषदेच्या गोंदी सर्कलमधून निवडणुकीस इच्छुक आहेत.

पोलिसांची मोठी कारवाई 
अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील केशव वायभट याला स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. फरार असलेल्या उर्वरित तिघांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. यापूर्वी यातील आरोपींना तडीपार करण्यात आले होते, मात्र त्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याने आता थेट १ वर्षासाठी स्थानबद्धतेचा निर्णय घेण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे गोदाकाठच्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna: Sand mafia crackdown! Shiv Sena leader, 3 others face MPDA.

Web Summary : Jalna authorities invoked MPDA against four individuals, including a Shiv Sena Ambard leader, for illegal sand mining. One arrested, others at large.
टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी