मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडून मोसंबी मार्केटची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:32 IST2021-09-27T04:32:27+5:302021-09-27T04:32:27+5:30

जालना येथील मोसंबी मार्केटमध्ये मोसंबी मोठ्या प्रमाणात येत आहे. या मोसंबीला मुंबईतील बाजारात चांगला दर मिळावा, यासाठी माजी मंत्री ...

Inspection of Mosambi Market by Mumbai office bearers | मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडून मोसंबी मार्केटची पाहणी

मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडून मोसंबी मार्केटची पाहणी

जालना येथील मोसंबी मार्केटमध्ये मोसंबी मोठ्या प्रमाणात येत आहे. या मोसंबीला मुंबईतील बाजारात चांगला दर मिळावा, यासाठी माजी मंत्री तथा कृउबाचे सभापती अर्जुन खोतकर यांनी मुंबई कृउबाच्या पदाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, शरद कोळके, वैभव क्षीरसागर यांनी जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, व्यापाऱ्यांशी संवाद साधला. बाजार समितीकडून संजय खोतकर यांनी डक व अन्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी संचालक अनिल सोनी, तुळशीराम काळे, सुभाष बोडखे, सचिव रजनीकांत इंगळे, मोहन राठोड, अनिल खंडागळे, भगवान शिंदे, नाथा घनघाव, मुकेश महाजन, विष्णू हळगे, माऊली खांडेकर, मोसंबी उत्पादक शेतकरी आत्माराम नानोटे, अशोक गायकवाड, अशोक एखंदे, मिलिंद कुलकर्णी यांच्यासह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.

फोटो

Web Title: Inspection of Mosambi Market by Mumbai office bearers