Maharashtra Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 03:38 PM2019-09-20T15:38:11+5:302019-09-20T15:40:48+5:30

शरद पवार यांची जालना येथे कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा 

If it comes to power, it will give a quick waiver to the farmers | Maharashtra Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार

Maharashtra Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार

googlenewsNext
ठळक मुद्देलोकांचे अश्रु पुसण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे महाजनादेश यात्रेत मग्न सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल

जालना : कर्जाचा बोजा सहन होत नसल्याने राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार उद्योग धार्जिणे असून असंवेदनशील आहे. या सरकारला आगामी निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा. आमची सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी देऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कोल्हापुर, सांगली, गडचिरोली भागात पुराने थैमान घातले होते. त्यामुळे सामान्य माणूस अडचणीत सापडला होता. अशाही स्थितीत त्या भागात जाऊन लोकांचे अश्रु पुसण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे महाजनादेश यात्रेत मग्न होते. त्यावेळी किल्लारी येथे पहाटे चार वाजता भुकंप झाला होता. त्यावेळी आपण मुख्यमंत्री असताना सकाळी सात वाजता तेथे पोहोचून मदत कार्याला गती दिल्याचे पवार म्हणाले. 

सरकारचा गडकिल्ल्यांचा पर्यटन स्थळात रुपांतर करण्याचा निर्णय हास्यंपद आहे. या किल्ल्यांमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य इतिहास रचला होता. तेथे हे सरकार छमछम.. संस्कृती रुजू पाहत आहेत. ही खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले.  केंद्र आणि राज्य सरकार उद्योजकांचे ८६ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी का ? करत नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल, असेही ते म्हणाले. एकूणच सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी असून, तरुणांना रोजगाराची संधीही उपलब्ध करुन देत नाही. केवळ फसव्या घोषणा करुन लोकांची दिशाभूल करत असल्याने आगामी निवडणुकीत सरकारला खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्ष नेते धनजंय मुंढे यांनीही सरकारवर चौफेर टिका करत सरकारचे धेय धोरण हे शेतकरी आणि तरुणांच्या हिताचे नसल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. राजेश टोपे यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले.

Web Title: If it comes to power, it will give a quick waiver to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.