The explosive tempo was reversed; Big losses were avoided | स्फोटके घेऊन जाणारा टेम्पो उलटला; मोठी हानी टळली
स्फोटके घेऊन जाणारा टेम्पो उलटला; मोठी हानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : रस्त्यात आलेल्या बैलगाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने स्फोटके घेऊन जाणारा टेम्पो उलटला. हा अपघात गुरूवारी दुपारी तालुक्यातील भायडी गाव शिवारात घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही.
स्फोटके घेऊन एक टेम्पो गुरूवारी दुपारी दानापूर मार्गे भोकरदनकडे येत होता. हा टेम्पो तालुक्यातील भायडी गाव जवळ आला असता विरूध्द दिशेने येणारी बैलगाडी आडवी आली.
अचानक बैलगाडी आडवी आल्याने अपघात होऊ नये म्हणून चालकाने टेम्पो बाजूला घेऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटून झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
टेम्पो मुख्य रस्त्यावरच उलटला. मात्र, सुदैवाने चालकाला हानी झाली नसून, सुदैवाने स्फोटकांमुळेही कोणती दुर्घटना घडली नाही. या वाहनात मोठ्या संख्येने ब्लास्टिंगचे तोटे, स्फोटक पदार्थ होते. (याचा संबंधितांकडे परवानाही आहे) या स्फोटकांचा भडका उडाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. हे वाहन बुलडाणा जिल्ह्यातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच नागरिकांनी चालकाला मदत केली.

Web Title: The explosive tempo was reversed; Big losses were avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.