वहिवाटीचा रस्ता खुला करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST2021-02-16T04:32:00+5:302021-02-16T04:32:00+5:30

नाव्हा येथील गणेश रामदास भुतेकर यांनी चार एकर शेत जमिनीपैकी तीन एकर क्षेत्रांमध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांपासून द्राक्षाचे ...

Demand for clearing the way for occupation | वहिवाटीचा रस्ता खुला करून देण्याची मागणी

वहिवाटीचा रस्ता खुला करून देण्याची मागणी

नाव्हा येथील गणेश रामदास भुतेकर यांनी चार एकर शेत जमिनीपैकी तीन एकर क्षेत्रांमध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांपासून द्राक्षाचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. २०१२च्या मोठ्या दुष्काळामध्येही त्यांनी आपली द्राक्ष बाग वाचविली, शिवाय २०१६ मध्ये असाच प्रसंग आला होता. शेतातच घर करून राहात असल्यामुळे शेती करताना फारशी अडचण भासत नाही. स्वतःच्या शेतात छोट्या-मोठ्या गोष्टी आणण्यासाठी, खत, बियाणे आणण्यासाठी ये-जा करायची कुठून हा नेहमीचाच प्रश्न त्यांच्यासमोर आहे. नाव्हा वखारी रस्त्यापासून अगदी अडीचशे फूट एवढे जेमतेम अंतर असणाऱ्या वहिवाटीच्या रस्त्यासाठी रीतसर अर्ज सादर केले. महसूल विभागाकडून सदरील रस्ता खुला करण्याचे आदेशही देण्यात आले, परंतु तो रस्ता खुला करून दिला जात नसल्याचे गणेश भुतेकर यांनी सांगितले.

Web Title: Demand for clearing the way for occupation