शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने पेरलेले समाजातील अभ्यासकच मराठा आरक्षणाचे मारेकरी, मनोज जरांगे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 14:19 IST

मराठा समाजात अनेक अभ्यासकांचा जन्म, असं वाटतंय हे सरकारनेच पेरले: मनोज जरांगे

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : या लोकांना उत्तर द्यायचं सुद्धा मला वाईट वाटतं. मराठा समाजात एवढ्या अभ्यासकांनी जन्म घेतला आहे, असं वाटतंय की सरकार पक्षानेच हे लोक पेरले आहेत. मराठा आरक्षणाचे मारेकरी हेच लोक आहेत की काय? यांची पार्श्वभूमी बघितली तर हे सत्ताधारी पक्षाचेच आहेत, अशी टीका बाळासाहेब सराटे यांनी केलेल्या आरोपावर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली. जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आज माध्यम प्रतिनिधिसोबत संवाद साधला.

सगेसोयऱ्यांची मागणी फक्त जरांगे पाटील करत आहे. ही मागणी त्यांच्या डोक्यात कोणत्या कायदे तज्ञांनी घातली, माहिती नाही असे बाळासाहेब सराटे म्हणाले होते. मनोज जरांगे पुढे म्हणाले, सगेसोयरेची अधिसूचना काढताना वाशीमध्ये तुम्ही होतात तेव्हा गोड लागलं, आम्ही तुम्हाला चर्चेला पाठवलं तेव्हा गोड लागलं. तुम्हाला वाटतं ओबीसीपेक्षा ईडब्ल्यूएस आरक्षण चांगल आहे. कशाला ते १६ टक्के आरक्षण चॅलेंज केलं. मग मराठा समाजाला, मला ढ समजता का. मला लांब काढायचं का तुम्हाला? जाऊ का बाजूला मी? सरकारने तुम्हाला आमिष दाखवला असेल. अजूनही वेळ गेली नाही. मराठा अभ्यासकांनी अंतरावली सराटीत येऊन चर्चा करावी असे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले आहे.

महाराष्ट्रभर पाच टप्प्यात शांतता रॅलीउद्यापासून मनोज जरंगे पाटील यांच्या मराठवाड्यातील शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीचा शब्द दिलाय. मराठा आणि कुणबी एकच असा अध्यादेश काढला पाहिजे. मराठा समाजाला वेळोवेळी रस्त्यावर यावं लागणार आहे. त्यामुळे शांतता रॅली महाराष्ट्रभर काढणं गरजेचं आहे. पहिल्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. पूर्ण महाराष्ट्रभर पाच टप्प्यांमध्ये शांतता रॅली होणार आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील