जालना: शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बोरगाव (खु.) येथील सहायक कृषी अधिकारी राजकुमार मोतीराम खिल्लारे (४८) याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी त्याला प्रोत्साहन देणारा खासगी इसम ज्ञानेश्वर उर्फ माउली पवार याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुदानासाठी लाचेची मागणीतक्रारदाराने आपल्या शेतात लावलेल्या आंबा बागेचे शासनाकडून मिळणारे अनुदान मिळवण्यासाठी 'कुशलचे मस्टर' ऑनलाईन करणे आवश्यक होते. हे काम करण्यासाठी खिल्लारे याने ५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने जालना एसीबीकडे धाव घेतल्यावर सोमवारी सापळा रचण्यात आला. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने खिल्लारे आणि पवार या दोघांनाही बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून लाचेची रक्कम, मोबाईल आणि एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे.
बीडमध्येही ग्रामविकास अधिकाऱ्यावर गाजएसीबीच्या छत्रपती संभाजीनगर पथकाने केवळ जालन्यातच नव्हे, तर बीड जिल्ह्यातही मोठी कारवाई केली. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामविकास अधिकारी सोपान नामदेव मुसळे (४८) यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुहेरी कारवाईमुळे महसूल आणि ग्रामविकास विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
Web Summary : Jalna agriculture officer held accepting bribe for scheme benefits. Beed Gram Vikas officer booked; ACB action causes stir in revenue, rural development departments.
Web Summary : जालना में कृषि अधिकारी योजना के लाभ के लिए रिश्वत लेते गिरफ्तार। बीड में ग्राम विकास अधिकारी पर मामला दर्ज; एसीबी की कार्रवाई से राजस्व, ग्रामीण विकास विभागों में हड़कंप।