शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक बँकेने घटविला विकास दराचा अंदाज; भारताचा जीडीपी या वित्त वर्षात ६ टक्केच राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 06:40 IST

वॉशिंग्टन : जागतिक बँकेने भारताच्या यंदाच्या वित्तीय वर्षातील आर्थिक विकास दराच्या अंदाजात कपात केली असून, तो अवघा ६ टक्के ...

वॉशिंग्टन : जागतिक बँकेने भारताच्या यंदाच्या वित्तीय वर्षातील आर्थिक विकास दराच्या अंदाजात कपात केली असून, तो अवघा ६ टक्के असल्याचे म्हटले आहे. या आधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफ) भारताच्या विकासदराच्या अंदाजात अशीच कपात केली होती. रिझर्व्ह बँकेनेही तसाच सूर लावला होता.जागतिक बँकेने दक्षिण आशियातील देशांच्या आर्थिक स्थितीबाबत तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारताचा आर्थिक विकास दर २०२१ साली ६.७ टक्के व २०२२ सालापर्यंत ७.२ टक्के होण्याची शक्यता आहे.जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांची लवकरच वार्षिक बैठक होणार असून, त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारताच्या आर्थिक विकास दरात सलग दुसऱ्या वर्षीही घसरण झाली आहे. २०१७-२०१८साली भारताचा आर्थिक विकास दर ७.२ टक्के होता. त्यात घसरण होऊन २०१८-१९ साली तो ६.८ टक्के झाला. आता २०१९-२० या सालासाठी विकास दर ६ टक्के राहील, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या विकास दरामध्ये ०.३० टक्क्यांनी कपात करून तो ७ टक्के इतका असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्या आधी रिझर्व्ह बँकेने देशाचा आर्थिक विकास दर ६.८ टक्क्यांवरून ६.१ इतका कमी केला होता. मात्र, कृषी उत्पादन व सेवाक्षेत्राचा झालेला विस्तार यामुळे औद्योगिक विकास दर ६.९ टक्के झाला आहे.

वेगवान अर्थव्यवस्थाभारताचा आर्थिक विकास दर काहीसा मंदावला असला, तरीही जागतिक स्तरावर झपाट्याने वाढणाºया अर्थव्यवस्थांमध्ये भारताला अजूनही महत्त्वाचे स्थान आहे, असे जागतिक बँकेचे दक्षिण आशिया विभागासाठीचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ हान्स टीमर यांनी सांगितले.