शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 21:45 IST

Syria Israel Conflict : इस्रायलकडून हल्ले सुरू असतानाच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शरा यांनी एक निवेदन जारी केले

Syria President Al-Sharaa warning Israel : सीरियाची राजधानी दमास्कसला इस्रायल सातत्याने लक्ष्य करत आहे. बुधवारी संध्याकाळी इस्रायलने दमास्कसवर हल्ला केला. या इस्रायली हल्ल्यामुळे सिरियातील ड्रुझ समुदायातील तणाव वाढला. त्यामुळे इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान, सीरियाचे अध्यक्ष अहमद अल-शरा यांनी निवेदन जारी केले आणि इस्रायलला स्पष्ट शब्दात ठणकावले की, आम्ही युद्धाला घाबरत नाही, आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य आव्हानांशी लढण्यात घालवले आहे.

अल-शरा यांच्या पहिल्या सार्वजनिक निवेदनात, त्यांनी इस्रायलवर सीरियामध्ये जातीय फूट पाडण्याचा आरोप केला आणि इशारा दिला की एका आघाडीवर विजय मिळणे म्हणजे सर्वत्र विजय निश्चित असे होत नाही. त्यांनी स्पष्ट केले की, सीरिया कोणताही बाह्य हस्तक्षेप स्वीकारणार नाही. विशेषतः ड्रुझच्या बाबतीत काहीही ऐकणार नाही.

VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने दाणादाण

ड्रुझ समुदाय देशाचा आत्मा: अल-शरा

अल-शराने म्हटले आहे की, ड्रुझ समुदाय हा आपल्या देशाचा आत्मा आहे. त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. सरकारवरील वाढत्या हल्ल्यांमध्ये आणि अंतर्गत संघर्षांमध्ये, त्यांनी संघर्षापेक्षा संवादाला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. अमेरिका, अरब आणि तुर्कीच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखली गेली आहे. बाहेरील हस्तक्षेप होऊ देणार नाही. आम्ही युद्धाला घाबरत नाही, परंतु सीरियाला विनाशाच्या आगीत जाऊ देणार नाही.

भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या (VIDEO)

इस्रायल IDF चा दावा काय?

इस्रायली संरक्षण दलांनी (IDF) दावा केला आहे की, त्यांनी सीरियाच्या स्वेदा प्रदेशात सीरियन सरकारी दलांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. एका निवेदनात, आयडीएफने या हल्ल्यांचा एक नवीन व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये लष्करी तळ आणि वाहनांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येते. सूत्रांच्या माहितीनुसार, या ताज्या हल्ल्यांमध्ये इस्रायली हवाई दलाने जड मशीन गनने सुसज्ज बख्तरबंद वाहने आणि पिकअप ट्रकला लक्ष्य केले.

स्वेदा हे शहर बहुसंख्य ड्रुझ समुदायाचा गड मानले जाते आणि सध्या तेथेच गंभीर संघर्ष सुरू आहेत. IDF ने म्हटले आहे की, दक्षिण सीरियामध्ये केवळ लष्करी वाहनेच नव्हे तर सीरियन सैन्याच्या चौक्या, शस्त्रास्त्रे डेपो आणि इतर मोक्याच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. हे हल्ले अशा वेळी होत आहेत.

टॅग्स :SyriaसीरियाIsraelइस्रायलPresidentराष्ट्राध्यक्ष