शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करण्यात विजया गड्डेंची महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 03:19 IST

गड्डे या ट्विटरच्या कायदा तसेच सुरक्षा प्रमुख

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्यामागे मायक्रोब्लॉगिंग साईटच्या ज्येष्ठ विधिज्ञ भारतवंशीय विजया गड्डे यांची महत्त्वाची भूमिका होती. हा महत्त्वाचा निर्णय ट्रम्प समर्थकांच्या अमेरिकी संसदेवरील हल्ल्यानंतर घेण्यात आला होता.हैदराबादेत जन्मलेल्या ४५ वर्षीय गड्डे या ट्विटरच्या कायदा, लोकनीती व विश्वास तसेच सुरक्षा प्रमुख आहेत. शुक्रवारी त्यांनीच ट्विट करून ट्रम्प यांचे अकाऊंट आणखी हिंसेची जोखीम पाहता ट्विटरवरून कायमस्वरूपी निलंबित केले जात आहे, अशी माहिती दिली होती. ट्रम्प यांचे अकाऊंट निलंबित केले तेव्हा त्यांचे ८.८७ कोटी फॉलोअर्स होते; तसेच ते ५१ जणांना फॉलो करीत होते.

गड्डेयांच्या ट्विटर प्रोफाईलनुसार, २०११मध्ये त्या कंपनीशी जोडल्या गेल्या. त्यापूर्वी त्या अमेरिकी कंपनी जूनिपर नेटवर्क्समध्ये वरिष्ठ विधिज्ञ संचालक होत्या. त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये लॉ फर्म विल्सन सेन्सिनी गुडरिक अँड रोसाटीमध्ये सुमारे एक दशकभर काम केले आहे. त्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी लॉ स्कूलच्या विश्वस्त मंडळात व जागतिक मानवीय साहाय्य व विकास संघटना मर्सी कॉर्प्सच्या संचालक मंडळातही होत्या. त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून ज्यूरिस डॉक्टर (जेडी) ची पदवी मिळविली होती. यापूर्वी त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये बी. एस‌्सी. केली होती. त्या बालपणी आई-वडिलांसमवेत अमेरिकेत आल्या होत्या. त्यांचे बहुतांश बालपण टेक्सास व न्यूजर्सीमध्ये गेले. त्यांना कथा, साहित्य, वाचन, पर्यटन व स्वयंपाक करण्यासही आवडते.ट्विटर प्रमुख जॅक डोर्सी यांनी २०१९मध्ये ट्रम्प यांची भेट घेतली होती तेव्हा विजया त्यांच्यासमवेत होत्या. दलाई लामा यांची डोर्सी यांनी भेट घेतली होती, तेव्हाही त्या त्यांच्यासमवेत होत्या. एका अहवालानुसार, ट्विटर मुख्यालयात त्या व डोर्सी यांचे कॅबिन नजिक आहेत. ट्विटरच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयात त्यांचा सहभाग असतो. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पTwitterट्विटर