व्हेनेझुएलाचे ऑइल टँकर भारताच्या दिशेने रवाना; ३ कार्गो शिपमध्ये २० लाख बॅरेल तेल येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 07:30 IST2026-02-25T07:23:00+5:302026-02-25T07:30:54+5:30

२०१९ मध्ये अमेरिकेच्या निर्बंधांमुळे पुरवठा थांबण्यापूर्वी भारत एकेकाळी व्हेनेझुएलाच्या क्रूड तेलाचा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार होता.

Venezuelan oil tankers set sail for India; 2 million barrels of oil will arrive in 3 cargo ships | व्हेनेझुएलाचे ऑइल टँकर भारताच्या दिशेने रवाना; ३ कार्गो शिपमध्ये २० लाख बॅरेल तेल येणार

व्हेनेझुएलाचे ऑइल टँकर भारताच्या दिशेने रवाना; ३ कार्गो शिपमध्ये २० लाख बॅरेल तेल येणार

नवी दिल्ली - व्हेनेझुएनलाने भारतात मोठ्या प्रमाणात तेल निर्यात करणे सुरू केले आहे. २ मिलियन बॅरेल कच्चे तेल निर्यात करणारे ३ मोठे टँकर भारताच्या दिशेने रवाना झालेत. व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यात झालेल्या डीलनंतर जागतिक व्यापारात मोठा बदल दिसून येत आहे. दक्षिण अमेरिकन देशातून निर्यातीसाठी खूप मोठे क्रूड कॅरियर्स (VLCCs) चार्टर्ड करण्यात आले आहेत. यामुळे भारतात डिलिव्हरी वाढेल. VLCCs ही जागतिक शिपिंगमधील सर्वात मोठी जहाजे आहेत, जी सुएझमॅक्स टँकरच्या जवळजवळ दुप्पट आणि अफ्रामॅक्सच्या जवळजवळ चार पट सामान वाहून नेतात.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

माहितीनुसार, विटोल आणि ट्रॅफिगुरा यांनी चार्टर्ड केलेल्या तीन व्हीएलसीसी निसोस केआ, निसोस किथनोस आणि अर्जाना यांना सरकारी मालकीच्या तेल कंपनी पीडीव्हीएसएच्या जोस टर्मिनलवर मार्चमध्ये लोडिंग स्लॉट देण्यात आले आहेत. ही तिन्ही जहाजे भारताकडे रवाना झाले आहेत. आणखी एक सुपरटँकर ऑलिंपिक लायन व्हेनेझुएलामध्ये पोहचणार आहे. यामुळे पुढील महिन्यापासून मोठ्या कार्गोसाठी वाहतूक खर्च कमी होईल आणि डिलिव्हरी वेळेत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

भारतीय रिफायनर्ससाठी ही घटना अत्यंत महत्त्वाच्या वेळी घडली आहे. २०१९ मध्ये अमेरिकेच्या निर्बंधांमुळे पुरवठा थांबण्यापूर्वी भारत एकेकाळी व्हेनेझुएलाच्या क्रूड तेलाचा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार होता. आता अमेरिकेने नवीन परवाना चौकटीअंतर्गत निर्बंध शिथिल केल्याने व्यापार पुन्हा तेजीत आहे. अमेरिकेतील प्रमुख शेवरॉनने अलीकडेच डिसेंबर २०२३ नंतर त्यांचा पहिला व्हेनेझुएलाच्या क्रूड कार्गो रिलायन्स इंडस्ट्रीजला विकला आहे. बॉस्कन हेवी क्रूड शिपमेंट ही जवळजवळ सहा वर्षांतील अशी पहिली विक्री आहे. रिलायन्सने विटोलकडून २० लाख बॅरलचा कार्गो देखील खरेदी केला आहे आणि तो थेट पीडीव्हीएसएकडून खरेदी करण्याचा विचार करत आहे.

भारताला रशियन तेलावरील अवलंबित्व कमी करायचंय?

दरम्यान, या व्यापारी संस्थेने व्हेनेझुएलाचे हेवी क्रूड तेल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि एचपीसीएल मित्तल एनर्जी यांनाही विकले आहे. भारत आपल्या क्रूड सोर्सिंगमध्ये विविधता आणण्याचा आणि रशियन पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जाते. भारतीय रिफायनर्स व्हेनेझुएलाच्या सवलतीच्या दरातील हेवी क्रूड तेलाकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत. 

Web Title : वेनेजुएला के तेल टैंकर भारत की ओर रवाना; 20 लाख बैरल तेल आएगा

Web Summary : अमेरिका द्वारा प्रतिबंधों में ढील दिए जाने के बाद वेनेजुएला ने भारत को तेल निर्यात फिर से शुरू किया। 20 लाख बैरल कच्चे तेल लेकर तीन टैंकर भारत की ओर बढ़ रहे हैं, जिससे रूसी तेल पर निर्भरता कम हो सकती है। भारतीय रिफाइनर रियायती वेनेजुएला के भारी कच्चे तेल की ओर आकर्षित हैं।

Web Title : Venezuela Oil Tankers Head to India; 2 Million Barrels En Route

Web Summary : Venezuela resumes oil exports to India after US sanctions ease. Three tankers carrying 2 million barrels of crude oil are heading to India, potentially reducing reliance on Russian oil. Indian refiners are attracted by discounted Venezuelan heavy crude.