US Iran: अमेरिकेच्या ३ युद्धनौका आणि २५०० सैन्य युद्धभूमीकडे, होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन देश आमने-सामने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:28 IST2026-03-21T09:26:34+5:302026-03-21T09:28:04+5:30

Iran US War Hormuz Strait: मध्य पूर्वेतील लष्करी संघर्ष वाढवण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेने युद्धनौका आणि सैन्य पाठवल्याची माहिती समोर आली आहे. 

US Iran: 3 US warships and 2500 troops heading to the battlefield, two countries face off in the Strait of Hormuz! | US Iran: अमेरिकेच्या ३ युद्धनौका आणि २५०० सैन्य युद्धभूमीकडे, होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन देश आमने-सामने!

US Iran: अमेरिकेच्या ३ युद्धनौका आणि २५०० सैन्य युद्धभूमीकडे, होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन देश आमने-सामने!

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले जात असताना, हा संघर्ष आणखी वाढण्याचेच संकेत मिळत आहेत. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत बंद करत नाक दाबल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खवळले आहेत. आता समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने तीन युद्धनौका आणि २५०० सैन्य होर्मुझ सामुद्रधुनीकडे रवाना केले आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएसएस बॉक्सरसह ती अम्फिबियस असॉल्ट युद्धनौका आणि ११व्या नौदल तुकडीचे जवळपास २५०० जवान दिएगोतील तळावरून रवाना झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, युद्धनौका मध्य पूर्वेसाठी तैनात केल्या आहेत. पण, युद्धनौकांच्या ठिकाणांबद्दल गोपनीयता बाळगण्यात आली आहे. 

पर्यटन स्थळे सुरक्षित राहणार नाही

दरम्यान, इराण लष्कराचे वरिष्ठ प्रवक्ता जनरल अबोलफज्ल शेकरची यांनी इशारा दिला आहे की, जगातील पर्यटन आणि मनोरंजन स्थळे इराणच्या शूत्रंसाठी सुरक्षित राहणार नाही. 

इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणचे अनेक मोठे नेते आणि अधिकारी मारले गेले. त्यानंतर इराणकडून हा इशारा देण्यात आला आहे. इस्रायलने इराणच्या ऊर्जा ठिकाणांनाही लक्ष्य केले आहेत. त्यामुळे इराणकडूनही आता हल्ल्यांची तीव्रता वाढवण्यात आली आहे. 

तेल, गॅस ठिकाणांवर हल्ले

मागील काही दिवसांपासून हल्ल्यांचे केंद्र बदलताना दिसत आहे. इस्रायल-अमेरिकेकडून इराणच्या लष्करी आणि नागरी ठिकाणांवर हल्ले होत होते. मात्र, आता इस्रायलकडून थेट तेल आणि गॅस काढल्या जाणाऱ्या ठिकाणांवरच हल्ले केले गेले. 

या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखाती देशांतील तेल रिफायनरी आणि गॅस उत्पादक ठिकाणांवर हवाई हल्ले केले. यात कतारच्या एका केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. कुवैतच्याही मीना-अल-अहमदी रिफायनरीवरही इराणने दोन टप्प्यात हल्ले केले. यामुळे जगातील सर्वात मोठ्या रिफायनरीपैकी एक असलेल्या या रिफायनरीचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

तेल संकट वाढले

होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल-गॅस वाहतूक ठप्प झालेली आहे. त्यात इराणने आता आखाती देशातील गॅस आणि तेल साठ्यांवरच हल्ले सुरू केले आहे. त्यामुळे जगातील तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०८ डॉलरवर गेली आहे. याचा थेट परिणाम भारत, चीन आणि जपान या देशांवर झाला आहे. 

Web Title : ईरान तनाव के बीच अमेरिका ने होर्मुज जलडमरूमध्य में युद्धपोत तैनात किए

Web Summary : बढ़ते तनाव के बीच, अमेरिका ने ईरानी खतरों के बाद होर्मुज जलडमरूमध्य में युद्धपोत और सैनिक तैनात किए हैं। ईरान ने चेतावनी दी है कि कोई भी पर्यटन स्थल सुरक्षित नहीं है। खाड़ी तेल और गैस भंडार पर हमलों के बाद तेल की कीमतें बढ़ीं।

Web Title : US Deploys Warships to Hormuz Strait Amid Iran Tensions

Web Summary : Amid rising tensions, the US has deployed warships and troops to the Hormuz Strait following Iranian threats. Iran warns that no tourist destination is safe. Oil prices surge after attacks on gulf oil and gas reserves.